..तर तुम्ही शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा, रितेश देशमुखचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

दिल्ली । सध्या मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता पाठिंबा वाढत आहे.
आता अभिनेता रितेश देशमुखने शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. आज जर तुम्ही काही जेवण करत आहात, तर शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा. मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा असल्याचं रितेश देशमुखने म्हटलं आहे.
रितेशने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच्यासोबत अनेक अभिनेते, दिग्दर्शकांनी देखील या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अनेकांनी जाहीरपणे या आंदोलनाचे समर्थन केले आहे.
If you eat today, thank a farmer.
I stand in solidarity with every farmer in our country. #JaiKisaan
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 5, 2020
कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या शेतकऱ्यांच्या अनेक बैठका केंद्र सरकारसोबत झाल्या मात्र अजूनही तोडगा निघाला नाही.
यामुळे आता मोदी सरकारवर दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. यामुळे आता हे बील रद्द होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशभरात या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.