नादच खुळा! शेतकऱ्याचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक, पुर्ण गावाने केलं जंगी स्वागत

पुसद | यवतमाळ जिल्ह्यातुन एक अभिमास्पद गोष्ट समोर आली आहे. आरेगाव येथील अल्पभुधारक शेतकरी माणिकराव ठेंगे यांचा मुलगा सतीश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे.

त्याच्या या यशानंतर गावात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. गावात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोश साजरा करण्यात आला. अत्यंत गरीब परिस्थितीत त्याने आपले शिक्षण पुर्ण केले. त्याचे प्राथमिक शिक्षण पुसद येथे झाले.

मग त्याने बारावीनंतर दारव्हा येथे मुंगसाजी विद्यालयात डी. एड ची पदवी घेतली. यानंतर त्याने २०१२ मध्ये महाराष्ट्र पोलिस शिपायाची भरती दिली आणि पास केली. तो पोलिस शिपाई म्हणून नांदेड येथे रूजू झाला.

पोलिस खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धा परिक्षेत तो पास झाला आणि सध्या आख्या गावात त्याचीच चर्चा आहे. कोरोनाकाळात पोलिस दलातील रोजचे कामकाज, कोरोना कालावधी, निवडणूक बंदोबस्त या कठीण परिस्थितीतही त्याने अभ्यास सोडला नाही.

तो वेळात वेळ काढून रोज अभ्यास करत असे. आणि त्याला याचे फळ मिळाले. त्याच्या या यशानंतर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. त्याच्या मुळ गावी म्हणजे आरेगाव येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

गावकऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. गावकऱ्यांनी व विविध सामाजिक संस्थांनी सतिशचा सत्कार केला. अनेक तरूणांना त्याने प्रेरणा दिली आहे. इच्छाशक्ती असल्यास माणूस काहीही करू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे.

पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर सतिश म्हणाला की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांमुळे होतकरू तरूणांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची उत्तम संधी मिळू शकते. निश्चित ध्येय, दृढ इच्छाशक्ती असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही चांगले यश मिळवता येते, असे सतिश म्हणाला. सध्या सगळ्यात भागातून सतिशवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.