शेतकरी आंदोलन भडकले! संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले, राज्य सरकारचे दुर्लक्ष

गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर(Kolhapur) येथे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवस दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.(Farmers set fire to MSEB office in Sangli)

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली(Sangli) जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या सात दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी(Raju Shetty) कोल्हापूरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत.

शेतकऱ्यांना दिवस दहा तास वीज मिळावी, ही मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. पण राज्य सरकारने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील अनेक ठिकाणी शेतकरी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक होत आहेत. त्यातूनच ही घटना घडली आहे.

रविवारी रात्री उशिरा संतप्त शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालयाला आग लावली. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे अधिकाऱ्यांनी दीड तास अथक प्रयत्न करून महावितरणाच्या कार्यालयाला लागलेली आग विझवली.

या आगीत महावितरणची महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. तसेच या घटनेत महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचा रात्रीच्या वेळेत शेतात पाणी देत असताना सर्प दंशाने मृत्यू झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना दिवस दहा तास वीज द्या, वाढीव वीज दार रद्द करा,वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या, या मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारकडे केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
दादूस झाला शेठमाणूस; विनायक माळीने खरेदी केली ‘एवढ्या’ लाखांची मर्सिडीज; म्हणाला, ‘घेतली एकदाची’
‘नवाब मलिक चांगला माणूस अटक व्हायला नको होती’, केंद्रिय मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
जर पंधरा वर्षांपूर्वी कानाखाली लगावली नसती तर.., मराठी भाषा दिनादिवशी शर्मिला ठाकरेंचे मोठे वक्तव्य