तासगाव | मोबाईल आज आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. मोबाईलशिवाय माणूस जगू शकत नाही. मोबाईल नसल्यावर काही जण तर वेडे होतात. शिवाय रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना रिंग वाजली की आपण काहीवेळा गाडी चालवतानाच फोनवर बोलतो.
पण तासगावमधील एका बैलजोडीला चक्क मोबाईलच्या रिंगटोनचे वेड आहे. उत्तम जाधव यांच्याकडे ही बैलजोडी आहे. तासगावमधील उत्तम जाधव आजही आपल्या घरच्या बैलांनी शेती करतात.
त्यांनी लहानपणापासून त्या बैलांचा सांभाळ केला आहे आणि त्यांचे आपल्या बैलांवर खूप प्रेम आहे. ही बैलजोडी दिसायला ही सुंदर आहे. एकाचे नाव सोन्या तर दुसऱ्याचे नाव हरण्या. पण या बैलजोडीला एक सवय आहे.
ही सवय खरं तर आपण माणसांनीसुद्धा लावून घेतली पाहिजे. बैलांना बैलगाडीला जुंपलेले असो किंवा कुळवाला आणि पेरणीला मालकाच्या मोबाइलची रिंग वाजली की सोन्या-हरण्या जाग्यावर थांबतात.
यामागचे कारण उत्तम यांना विचारले तर ते म्हणाले बैलांना तशी सवय लागली आहे. मालकाच्या मोबाइलची रिंग जणू त्यांच्यासाठी थांबण्याचा एक इशारा आहे. जेव्हा मालकाने मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या काळात मोबाईलची रिंग वाजली की, मालक कासरा ओढायचे.
दर वेळेस रिंग वाजली की मालक कासरा ओढायचे यानंतर बैलांना आपोआप रिंग वाजली की थांबायची सवय लागली. पेरणीच्या काळात जर रिंग वाजली की जोपर्यंत मालकाचे बोलणे पूर्ण होत नाही तोपर्यंत ही बैलजोडी जागेवरची हालत सुद्धा नाही व पेरणीला उशीर होतो. त्यामुळे मालकाला फोन सायलेंट ठेवावा लागतो. या अनोख्या बैलजोडीची चर्चा सध्या पूर्ण तालुक्यात होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
एक रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग, जाणून घ्या कसा बनला अविनाश भोसले करोडोंच्या कंपनीचा मालक
पवारांचे वर्गमित्र सायरस पुनावाला वुहानच्या व्हायरसवर भारी पडणार? वाचा सिरमचा इतिहास..