सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात

मुंबई | भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देश-विदेशातून पाठिंबा मिळत आहे. मात्र भारतातच काही सेलिब्रिटी तसेच क्रिकेटपटूंनी या आंदोलनाच्या विरोधी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केल्याचे पाहायला मिळत आहे.

पॉपस्टार रिहानाने भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तिने आंदोलनासंबंधी एक बातमी शेअर करत ‘आपण यावर का बोलत नाही’ असा सवाल केला. या बातमीत शेतकऱ्यांसाठी बंद केलेली इंटरनेट सेवा आणि पोलीस आणि शेतकऱ्यांच्यात होत असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. तिने #FarmersProtest असा हॅशटॅग वापरला आहे.

यानंतर आता भारतातील अनेक प्रसिद्ध चेहरे सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. शेतकरी आंदोलनाला ७० पेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर आपले मत व्यक्त करत आहेत. रिहानाला उत्तर देताना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले. यामध्ये त्यांनी #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग वापरले आहेत. यानंतर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरनेही, लता मंगेशकर, विराट कोहली तसेच अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी याच हॅशटॅगचा वापरत करत ट्विट केले आहेत.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असे ट्विट सचिन तेंडूलकर यांनी केले आहे.

तसेच विराट कोहली याने मतभेदांच्या ‘’या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरुन शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ’’ असं विराटने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईकरांच्या ‘त्या’ भावनिक क्षणामुळे आनंद महिंद्राही झाले भावूक, प्रार्थना करत म्हणाले..
टोल नाक्यावर गेल्यावर नुसता टोल भरू नका त्याचे फायदेही जाणून घ्या
मोठी बातमी! महाराष्ट्रात मतपत्रिकेनं मतदान होणार
जेव्हा राज ठाकरेंनी निलेश साबळेला १०-१२ वेळा फोन केला, तरी फोन नाही उचलला अन् जेव्हा फोन उचलला तेव्हा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.