बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. असे म्हणतात की, बटाट्याला कोणत्याही भाजीत टाकले तरी तो त्या भाजीत मिसळून जातो. बटाट्याचा वापर फास्टफुडमध्येसुध्दा केला जातो.
सगळ्यात जास्त वापर हा चिप्स बणवण्यासाठी केला जातो. चहाची टपरी असो किंवा मोठ्यातले मोठे मल्टिप्लेक्स प्रत्येक ठिकाणी चिप्सला मोठी मागणी आहे. आणि लहान असो वा मोठे सगळ्यांनाच चिप्स खुप आवडतात.
पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? सगळ्यात जास्त बटाटे हे भारतातून निर्यात होतात. आणि ते ही चिप्स आंतरराष्ट्रीय दर्जाचे चिप्स बनवण्यासाठीही भारतातून बटाटे मागवले जातात.
गुजरातमधील डोलपूर कंपा गावातील जितेश पटेल हे एक प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांनी एमएससी ऍग्री करून स्वतः १० एकरमध्ये बटाट्याचे उत्पादन घेतले. त्यसाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे.
त्यानंतर त्यांनी बालाजी आणि आयटीसीसारख्या कंपन्यांसोबत करार केला आहे. योग्य दर्जाचे आणि गुणवत्तेचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी कंपनीकडून आधुनिक शेतीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांना नंतर खुप फायदा झाला. त्यांनी गावातील इतर लोकांना यामध्ये समिल करून घेतले.
सध्या या गावात १००० एकरमध्ये लेडी रोझेटो या जातीच्या बटाट्याची लागवड केली जाते. त्यासाठी लागणारे हार्वेस्टिंग मशिन त्यांनी जर्मनीवरून मागवले आहे. तसेच ग्रेडिंग युनिट देखील सुरू केले आहे ज्यामध्ये बटाटे साफ केले जातात.
पटेल हे काम गेल्या २५ वर्षांपासून हे काम करत आहेत. दरवर्षी १००० एकरमधून २० हजार मेट्रिक टन बटाट्याच उत्पादन मिळते. १७ रूपये प्रति किलोने या बटाट्यांची विक्री केली जाते. सगळा खर्च वजा करता या सगळ्यांना तब्बल २५ कोटी रूपयांचा नफा मिळतो.