एकीकडे राज्यपालांना हेलिकॉप्टर नाकारलं, दुसरीकडे महिलेने राष्ट्रपतींना मागितले हेलिकॉप्टर

भोपाळ | मध्य प्रदेशातील मंदासौर जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेने शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहले आहे. अनेक दिवसांपासून रस्ता गावगूंडानी बंद केला. सरकारकडे तक्रार करूनही त्यांची कोणीही दखल घेत नसल्याने शेवटी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे.

बसंतीबाई लोहार या वृध्द शेतकरी महिलेने राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझी ०.४१ हेक्टर जमीन आहे. या जमिनीत कष्ट करून घर चालवण्यास मदत होते. गावातील काही गावगुंडानी शेतात जायच्या रस्त्यावर मोठा खड्डा केला आहे. त्यामुळे मला शेतात जाता येत नाही.

शेतात जाण्यासाठी रस्ता चालू करावा यासाठी मी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये मदत मागितली पण मला कुणीच मदत केली नाही. त्यामुळे मला हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्ज द्यावे आणि तसंच हेलिकॉप्टर चालवण्यासाठी लायसन्स उपलब्ध करून द्यावं. ज्यामुळे मला माझ्या शेतात जायला काही अडचण येणार नाही.

जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांना या पत्राबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तहसीलदारांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली असून लवकरच हा विषय मार्गी लावला जाईल. दरम्यान या मागणीची चर्चा होत असून शेतकरी महिलेला मदत केली जाते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
साताऱ्याच्या कॉलेजमध्ये मुलींची दहश.त, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
फक्त १२ रुपये भरा आणि मिळवा दोन लाख; मोदी सरकारची भन्नाट विमा योजना
राज्यपालांना विमानातून का उतरवलं गेलं? अखेर खरे कारण आले समोर
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.