शेतकरी आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला; व्हायरल मेसेज खोटा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांपैकी काहीजण लाल किल्लावरच्या बुरूजावर काही झेंडे फडकवले. यानंतर या झेंड्यावरून अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाली. लाल किल्ल्यावर चढलेल्या आंदोलकांनी देशाचा तिरंगा ध्वज खाली उतरवून खलिस्तानी झेंडा फडकावल्याचा दावा करण्यात आला पण हा दावा खरा की खोटा हे आता स्पष्ट झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांपैकी काहीजणांनी लाल किल्लावरच्या बुरूजावर काही झेंडे फडकवले. यानंतर या झेंड्यावरून चर्चा सुरू झाली. परंतु हा झेंडा खलिस्तानी समर्थकांचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच हा झेंडा शीख धर्मियांचा धार्मिक झेंडा असून त्याला निशाण साहिब असे म्हणतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये झेंड्यावर झूम करून पाहिल्यास झेंडा पिवळ्या रंगांचा असून त्यावर तलवारीचे चिन्ह आहे. हे चिन्ह गुरू गोविंद सिंह यांच्या काळात वापरले जायचे.

तसेच आंदोलकांनी तिरंगा काढून त्याच्या जागी दुसरा ध्वज लावलेला नाही. हे देखील स्पष्ट झाले आहे. बाजूला भारतीय तिरंगा ध्वज तसाच फडकत असून दुसऱ्या पोलवर हा ध्वज फडकावण्यात आला असल्यामुळे तिरंगा उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावल्याचा दावा आंदोलकांकडून फेटाळण्यात आला आहे.

‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार; मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती..

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्मह.त्या; त्याआधी फेसबुक पोस्ट करत म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.