Homeआर्थिकशेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार १५ लाख रुपये! फक्त करावे लागणार हे काम

शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार १५ लाख रुपये! फक्त करावे लागणार हे काम

केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार सतत प्रयत्न करत आहे. अलीकडेच सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील निधीचा १०वा हप्ता मिळाला आहे. पण याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये एफपीओ योजना देखील यामध्ये समाविष्ट आहे.

या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहेत. या योजनेसाठी तुम्हाला काही बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती राष्ट्रीय कृषी बाजार या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

वास्तविक, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम ११ लोकांची एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे, खते, बी-बियाणे आणि शेतीसाठी लागणारी औषधे खरेदी करणे सोपे होईल. या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला १५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजार या केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. राष्ट्रीय कृषी बाजार ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचे होम पेज दिसेल. या होम पेजवर तुम्हाला FPO या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुम्ही “Registration” या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या समोर नोंदणीसाठी अर्ज येईल. या अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्य रीतीने भरा. यानंतर तुम्ही तुमच्या बँक पासबुकची किंवा रद्द झालेल्या चेकची स्कॅन प्रत अपलोड करा. त्यांनतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

या वेबसाईटवर “login” करण्यासाठी राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आता तुमच्या समोर होम पेज उघडेल. यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा. आता login या पर्यायावर क्लिक करा. यांनतर तुमच्यासमोर login फॉर्म उघडेल. आता त्यामध्ये युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका. अशा पद्धतीने तुम्ही login कराल.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? कोर्टाने अटक वाॅरंट काढत दिले आदेश
‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना मरेपर्यंत फासावर लटकवा’; भाजप नेत्याची खळबळजनक मागणी
सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी का करण्यात आला? जाणून घ्या कारण..