शेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या, पहा धक्कादायक व्हिडीओ

नवी दिल्ली | दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांनी मंगळवारी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. ठरवलेल्या मार्गावरुन न जाता शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी किल्ल्यात असणाऱ्या पोलिसांवर तलवारी उगारण्यात आल्या. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ  समोर आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीमध्ये शेतकरी आणि पोलीस जवान यांच्यात मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेमुळे राजधानीत तणावाचे वातवरण पसरले आहे. दिल्लीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले आहेत. तसेच ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड केली. शेतकरी एवढचं करुन थांबले नाहीत. तर त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. तेथील खांबावर आपला झेंडा फडकवला आहे.

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवले आहेत. तसेच त्यांच्यावर लाठ्या काठ्या आणि तलवारी यांनी हल्ला चढवला आहे. याचाच एक व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे. हा व्हिडीओ लाल किल्ला परिसरातील आहे. यामध्ये पंधरा-वीस पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान आहेत. त्यांच्यावर शेतकरी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

 

आक्रमक शेतकऱ्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांना लाल किल्ल्याच्या इमारीतवरुन उड्या माराव्या लागल्या आहेत. या धक्कादायक व्हिडीओनुसार संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांवर एकच हल्ला चढवला आहे. हतबल झालेल्या पोलिसांकडे तब्बल पंधरा फुटांच्या भिंतीवरुन खाली उड्या मारण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच व्हिडीओत ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगवार चढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी झालेल्या हिंसाचारात ८० पोलिस जवान जखमी झाले आहेत. तसेच यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. पोलिसांकडून गुन्हे दाखल करत तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, धक्कादायक पद्धतीने दोघांचा मृत्यू
लाल किल्ल्यावर वादग्रस्त झेंडा फडकवणाऱ्या तरूणाचे भाजप कनेक्शन; भाजपचे पितळ उघडे पडले
शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…
“हिंसाचाराचं समर्थन करणारा प्रत्येक भारतीय दहशतवादीच”, दिल्ली हिंसाचारावर कंगना पुन्हा बरळली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.