“अदानी आणि अंबानींचा फायदा करून देण्यासाठी मोदींनी सोयाबीनचे भाव पाडले”

काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या किंमतींत कमालीची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारने १२ लाख टन सोयामीलची (तेल काढून उरलेला माल) आयात केल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. सोयाबीनच्या भावामध्ये एका आठवड्यात तब्बल साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल तीव्र घसरण झाली आहे.

सोयाबीन पाच सहा हजारांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे पुढील दोन तीन महिने हे भाव असेच घसरत राहतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता केंद्र सरकरावर शेतकरी आणि व्यापारी भडकले आहेत. सोशल मिडीयावर अनेक लोकांनी याच्याविरोधात आवाज उठवला आहे आणि केंद्र सरकारकडून यावर काहीच उत्तर आलेले नाही.

सरकारने यासाठी काहीतरी करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मोदी सरकारवर अनेक स्तरांतून सडकून टीका होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा पूजा अशोक मोरे यांनीही मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. त्यांनी फेसबूकला पोस्ट करून लिहीले आहे की, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनो आता तरी जागे व्हा…

देशात तेलबियांचा सर्वात मोठा ब्रँड म्हणजे फॉर्चुन. हा ब्रॅंड आदानी ग्रुपचा आहे. विदेशातील जनुकीय सोयाबीन आयात करून देशांतर्गत सोयाबीनचे भाव पाडून, अदानी अंबानीना खुश करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध..केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीन आयात केल्याने देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

सरकार कुणाचेही असो पण ते शेतकऱ्यांचे नाहीच. हेच कृषीप्रधान देशाचे खरे वास्तव आहे, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून #सोयाबीन हा हॅशटॅग सोशल मिडीयावर खुप ट्रेंडिंगला होता. मोदीजी कॅन्सल इंपोर्ट ऑफ सोयाबीन हा ट्रेंडही चालवण्यात आला होता.

अनेक लोकांनी याला पाठिंबा दिला होता. २५ ऑगस्टला सोयाबीनचा भाव हा ११ हजार १११ इतका होता. तोच भाव ३० ऑगस्टला घसरून १० हजार ५०० रूपयांवर आला. त्यानंतर ४ सप्टेंबरला हा भाव तब्बल ९ हजारांवर आला होता. त्यानंतर या भावात खुप मोठी घसरण झाली. १३ सप्टेंबरला हा भाव ८ हजार ५५० रूपयांवर आला होता.

त्यानंतर १७ सप्टेंबरला सोयाबीनचा भाव ८ हजार ४०० रूपयांवर आला. २१ सप्टेंबरला हा भाव खुपच घसरला आणि ६ हजार १०० वर आला होता. २३ सप्टेंबरला हाच भाव थेट ४ हजार ५०० रूपयांवर आला आणि याचे सगळ्यात मोठे कारण केंद्र सरकारने केलेली सोयाबीनचा निर्यात होती. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.

महत्वाच्या बातम्या
…त्यावेळी कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला; छगन भुजबळांनी सांगीतला ‘तो’ भयानक किस्सा
VIDEO: मलायका अरोराची चाल पाहून लोकांनी केले ट्रोल; म्हणाले, हिला मुळव्याध झालेला दिसतोय
भाजपच्या खासदाराला लोकांनी धु-धु धुतले, कपडेही फाडले; पहा मारहाणीचा भयानक व्हिडिओ
कोण आहे स्नेहा दुबे जिने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत इम्रान खान यांना झाप झाप झापले?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.