Share

Farmer Success Story: मराठवाड्यातील शेतकऱ्याची अनोखी कामगिरी! एका एकरात ‘या’ फळाची लागवड करून कमावले 11 लाख

Farmer Success Story:  पारंपरिक शेतीला आधुनिक वळण देत बीड (Beed) जिल्ह्यातील शिवणी (Shivni) गावातील परमेश्वर थोरात (Parmeshwar Thorat) या तरुण शेतकऱ्याने शेतीत वेगळा प्रयोग करून नफा कमावला आहे. कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाडा भागात त्यांनी एका एकरात अव्होकॅडो (Avocado) फळांची लागवड केली असून त्यातून त्यांना दरवर्षी सुमारे ११ लाख रुपयांचा नफा मिळतो आहे.

नवनवीन मार्ग शोधणारा प्रयोगशील शेतकरी

परमेश्वर थोरात यांची एकूण पाच एकर शेती असून सुरुवातीला ते पारंपरिक पिकांवरच अवलंबून होते. मात्र, वारंवार येणारा दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्यांना फारसा आर्थिक फायदा होत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.

युट्युबवरून घेतली प्रेरणा, परदेशी फळाची लागवड

युट्युबवर माहिती मिळवताना त्यांना अव्होकॅडोच्या लागवडीविषयी समजलं. हे फळ परदेशात लोकप्रिय असून कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते. याची बाजारात मागणी प्रचंड असून दरही आकर्षक असतो. ही माहिती अभ्यासून त्यांनी एका एकरमध्ये अव्होकॅडोची लागवड केली.

सुरुवातीपासूनच झाडांचे व्यवस्थापन काटेकोरपणे केल्यामुळे झाडांची चांगली वाढ झाली. काही वर्षांतच झाडांना फळे येऊ लागली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादनही घेतलं. आज त्यांच्या एका एकरातूनच त्यांना दरवर्षी ११ लाख रुपयांचा नफा मिळतो आहे.

या यशामुळे प्रेरित होऊन परमेश्वर थोरात आता उर्वरित जमिनीतही अव्होकॅडोची लागवड करण्याचा विचार करत आहेत. मर्यादित पाणी असूनही अधिक नफा देणारी ही शेती आता त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. त्यांचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now