Homeताज्या बातम्याशेतकऱ्याने भर सभेत व्यासपीठावर चढून भाजप आमदाराच्या कानाखाली खाडकन वाजवली; पहा व्हिडिओ..

शेतकऱ्याने भर सभेत व्यासपीठावर चढून भाजप आमदाराच्या कानाखाली खाडकन वाजवली; पहा व्हिडिओ..

उन्नावमध्ये भाजप आमदार पंकज गुप्ता यांना एका शेतकऱ्याने मंचावर सर्वांसमोर कानशिलात मारली आहे. यानंतर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्या शेतकऱ्याला खाली खेचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्याचे वय ६० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्याने भारतीय किसान युनियनची टोपी घातली होती. त्याच्या हातात काठीही होती. त्याने मंचावर येऊन थेट आमदाराच्या कानशिलात मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी विचारले असता, मला कोणीही कानशिलात मारली नाही, असे पंकज गुप्ता यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तीन दिवस जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. पुतळ्याच्या अनावरणासाठी आमदार त्या भागात आले होते. येथे जाहीर सभेचा कार्यक्रमही सुरू होता. यावेळी आमदार मंचावर होते. तेव्हा अचानक वृद्ध शेतकरी त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या कानाखाली मारली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

६० वर्षीय शेतकऱ्याचे नाव छत्रसाल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी भारतीय किसान युनियनची टोपी घातली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार माखी पोलीस स्टेशन हद्दीतील आयरा भडियार येथे एका मूर्तीच्या अनावरणासाठी पोहोचले होते. त्यावेळी जाहीर सभेचा कार्यक्रमही झाला. आमदार मंचावर असताना वृद्ध शेतकऱ्याने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना कानशिलात मारली. शेतकरी हा जनावरांच्या अन्नाच्या समस्येमुळे खुप त्रासलेला होता, त्यामुळे त्याने आमदाराच्या कानशिलात मारल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणूक २०२२ ची तयारी सुरू झाली आहे. ४०३ जागांच्या १८ व्या विधानसभेसाठी या निवडणुका फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होऊ शकतात. १७ व्या विधानसभेचा कार्यकाळ १५ मे पर्यंत आहे. या विधानसभेच्या ४०३ जागांसाठी ११ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१७ या कालावधीत ७ टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.

तसेच सुमारे ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ६३ टक्क्यांहून अधिक महिला होत्या, तर पुरुषांची टक्केवारी सुमारे ६० टक्के होती. निवडणुकीत भाजपने प्रथमच ३१२ जागा जिंकल्या आणि यूपी विधानसभेत तीन-चतुर्थांश बहुमत मिळवले होते.

महत्वाच्या बातम्या-
अभ्यासाऐवजी मुलगा आईच्या फोनवर गेम खेळत होता, निर्दयी बापाने बेल्टने झोडपून पोराचा जीव घेतला
धक्कादायक ! PM मोदींच्या हत्येमागे पाकिस्ताचा डाव?, ताफा थांबला ‘त्या’ ठिकाणी मिळाली पाकिस्तानी बोट
पंजाबातील मोदींचा ताफा थांबलेल्या ठिकाणी होती पाकिस्तानी बोट; देशभरात उडाली खळबळ