बार्शी तालुक्यातील एक शेतकरी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण तो चर्चेत येण्याचे कारण हे डोळ्यात पाणी आणणारे आहे. शेतकरी राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाचशे किलो कांदा विकला आहे. पण तो कांदा विकल्यानंतर त्यांना फक्त २ रुपयांचा चेक व्यापाऱ्याने दिला आहे.
शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक मिळाल्यामुळे राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्याची पट्टी आणि दोन रुपयाच्या चेकवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्या व्यापाऱ्याबाबतही संताप व्यक्त केला जात आहे.
राजेंद्र चव्हाण यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना कॉल केला होता आणि आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले ते हैराण करणारे होते. शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी मंत्री दादा भुसे यांना फोन लावल्यानंतर काय झालं? याची माहिती दिली आहे.
मला दोन रुपयांचा चेक वटवण्यासाठी ३०० रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे मंत्री दादा भुसे यांना फोन केला होता. दादा भुसेंनी मला मालेगावला या असे म्हटले. दोन रुपयांसाठी कुठे कुठे जाऊ आणि किती खर्च करु असं होतंय? असे शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजेंद्र चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डला १७ फेब्रुवारीला पाचशे किलो कांदा विकला होता. कांद्याचे दर घसरले होते. त्यामुळे हा कांदा प्रतिकिलो १ रुपयाने विकला गेला. त्यामुळे सर्व गोष्टींचे पैसे वजा करुन शेतकऱ्याच्या हातात फक्त २ रुपये आले आहे.
मार्केट यार्डमधील व्यापारी सुर्या ट्रेडर्सने शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक दिला होता. तसेच चेकवर अंतिम तारीख देखील दिली आहे. त्यावर ८ मार्च २०२३ ही शेवटची तारीख दिली आहे. त्यामुळे त्या व्यापाऱ्यावरही संताप व्यक्त केला जात आहे. अशात शेतकऱ्याला दादा भुसेंनी मालेगावला बोलवले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना राज्य सरकारमधील मंत्रीही थट्टा करत असल्याची खंत शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘आता फक्त एकच आशा उरलीय, ती म्हणजे..’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं शिवसेनेचं भविष्य
कोण मारणार बाजी? एक्झिट पोलमधून धाकधूक वाढवणारी आकडेवारी आली समोर
शिवसेनेची संपुर्ण संपत्ती उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार? संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का