हे आंदोलन थांबवण्यासाठी आता तुम्हीच पुढे या; मोदी सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्यांना पवारांचे आवाहन

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत आहे. या शेतकरी आंदोलनावरून राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मते शेतकरी आंदोलनात तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज. त्यासाठी कोणीतरी सिनियर मंत्री बोलणीसाठी हवा. स्वतः पंतप्रधान, संरक्षणमंत्री किंवा गडकरींसारखे मंत्री पुढं आले तर यात तोडगा मार्ग निघण्याची शक्यता आहे’, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, अलीकडेच पॉप स्टार रिहानाने आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. त्यानंतर अनेक जागतिक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती. तसेच मास्टरब्लास्ट भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच भडकले आहेत.

याचदरम्यान सचिन तेंडुलरकच्या विधानाबाबत शरद पवार यांनी भाष्य आहे. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असे शरद पवारांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

राज ठाकरेंनी सांगितला शेतकरी आंदोलनावर तोडगा काढायचा मार्ग…
भाजपला धक्का! ‘या’ बड्या माजी आमदाराचा पक्षाला रामराम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
‘कोण कुठली रिहाना? का तिला इतकं महत्व दिलं जातय?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.