नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी, विशेषत: पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. या शेतकऱ्यांमधील एका शेतकऱ्यानी मिडियाला प्रतिक्रिया दिली तसेच सरकारला इशाराही दिला आहे.
पंजाबमधील विविध भागातून हे शेतकरी आले आहेत. त्यातीलच पटियालातून आलेले करम सिंह सांगतात की, “बेटा, छह महिने का राशन लेके आये हैं, हटेंगे नहीं, डटे रहेंगे…’ सहा महिन्याच्या तयारीने आलोय. करम सिंह यांनी सत्तरी पार केलीय. ‘हमारा क्या हो गया सब, बच्चों का सवाल है, हमारे जमीन का सवाल है,’ असे ते म्हणाले.
नवीन कृषी कायद्याच्या विरोधात करम सिंह यांच्यासारखे त्यांच्याच वयाचे बरेच शेतकरी आले आहेत. आणि मागण्या पुर्ण झाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एल्गार सुरुच आहे. या आंदोलनाची धार वाढत चालली असून शेतकरी आंदोलक शांततापूर्ण वातावरणात थंडीमध्ये आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आणि मागण्या पुर्ण झाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत असा ईशारा आंदोलकांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध कॉलेजमधून तरुण-तरुणीही आले होते. कुणी पोस्टर रंगवून देत होतं, तर कुणी ताला-सुरात घोषणा देत होतं. अमृतसरमधूनही अनेक विद्यार्थी आले होते.
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका
महाराष्ट्रातील जातीयवाद संपवण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा क्रांतीकारी निर्णय