रात्र सरली पण आंदोलक शेतकरी जागचे हलले नाहीत

काल हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरियाणामध्ये अंबाला-पटियाला बॉर्डरवर अडवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संघर्ष पेटला. परंतु तरीही शेतकरी माघारी फिरले नाही. मोर्च्यातल्या या शेतकऱ्यांनी रात्र रस्त्यावरच घालवलीय.

दिल्लीच्या सीमेजवळच्या भागामध्ये पोलिस पथकं मोठ्या प्रमाणात रात्री तैनात होती. शेतकरी मोर्चा पुढे सरकू नये म्हणून तीन पातळ्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले होते आणि ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. तसेच दिल्ली – चंदीगढ हायवेजवळ सिंघु बॉर्डरवरही मोठ्या संख्येने पोलीस आणि CRPF जवान हजर होते.

रॉबिनदीप सिंह नावाच्या एका शेतकऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं, “आमच्याकडे एक महिन्याचं रेशन आहे. आमच्याकडे जेवण तयार करण्यासाठी स्टोव्ह आणि इतर गोष्टीही आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी आमच्याकडे ब्लॅंकेटही आहे.” त्यामुळे आता शेतकरी माघारी फिरणार नाही हे निश्चित आहे.

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाविरोधात सातत्याने शेतकरी आंदोलने होत आहे. कालही हरियाणा, दिल्लीतील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. संतप्त शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले आहे.

दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना दिल्ली आणि हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी अडवले. यावेळी हरियाणा पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धरपकड झाल्याचंही पाहायला मिळालं. पोलिसांनी लावलेले बॅरीकेट्स आंदोलक शेतकऱ्यांनी नदीत फेकून दिले.

तर पोलीसांकडून कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे शेतकऱ्यांवर मारले जात होते. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जाता होत्या. कडेकोट पहारा केला होता. आणि संविधान दिनादिवशीच पोलीस आणि शेतकऱ्यांचा संघर्ष पेटला होता.

भारत गॅसच्या ग्राहकांनो लक्ष द्या! केंद्राच्या या निर्णयाचा तुम्हाला बसणार फटका, जाणून घ्या

कर्णधारपदी रोहित की विराट? गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा लाईव्हशोमध्ये भिडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.