‘शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत आंदोलन करताना पाहून जीवाचं पाणी होतं’

मुंबई | केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सोमवारी सुरू आहे. आज या आंदोलनाचा १२वा दिवस असून देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत.

याच पार्श्वभूमीवर कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात उतरले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनीही आता नवीन कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे.

प्रियांकाने ट्वीट करत म्हटले की, ‘आमचे शेतकरी भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती कमी करण्याची गरज आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणे आवश्यक आहे. एक मजबूत लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की लवकरात लवकर हे संकट दूर होईल.’

माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच…
अभिनेता हेमंत ढोमे यानेही आता नवीन कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे. ट्विट करत हेमंत ढोमे म्हणतोय, ‘बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’

महाराष्ट्रातही भारतबंदचा परिणाम…
आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे अडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या
कृषी कायद्याला विरोधात सेलिब्रिटीही मैदानात; ‘माझ्या बापाला माझा पाठिंबा असणारच’
गुड न्यूज! फायजर, सीरमनंतर आता ‘या’ कंपनीने मागितली लससाठी मंजुरी
‘हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगतील’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.