शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ मध्ये काय सुरु, काय राहणार बंद; जाणून घ्या सविस्तर

केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच उद्या देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

डिसेंबरला ‘भारत बंद’च्या दिवशी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल.

तसेच रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवांना थांबवले जाणार नाही. तसेच लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच जर तुम्ही ऑफिससाठी किंवा अन्य कामांसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती माहिती घेणे गरजेचे आहे. गेले ११ दिवस नवी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. उद्या हे आंदोलन अधीकच पेटणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी याराजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.

दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक, पत्नी सायना बानोंनी केले ‘हे’ आवाहन

टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका! कोरोनाने घेतला अभिनेत्रीचा बळी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.