सरकार झोपा काढतय! मिरचीला १ रूपये किलोचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने झाडे उपटली; व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येईल

सध्या सोशल मीडियावर शेतकऱ्यांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हातबल झालेले दिसून येत आहे. तर काही शेतकऱ्यांच्या पीकाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्यांचा संताप होत आहे.

काही दिवसांपूर्वी एका टॉमेटोचे पीक लावणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नाशिकच्या एका शेतकऱ्याचा हा व्हिडिओ होता त्याने भररस्त्यात १ ते २ किलो टोमॅटो भाव मिळत असल्याने त्याने संताप व्यक्त करत कॅरेटच्या कॅरेट रस्त्यावर फेकले होते.

सोशल मीडियावर आताही एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक शेतकरी शेतातले मिर्चीचे पीक तोडताना दिसत आहे. बाजारात मिर्चीला फक्त १ रुपया किलो भाव मिळत असल्यामुळे त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमधून दिसून येते की एक शेतकरी आपल्या शेतातले मिर्चीचे पीक तोडताना दिसत आहे. यावेळी मिर्चीला भाव मिळत नसल्यामुळे त्यांनी संतापामध्ये हे सर्व पीक तोडले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही भाष्य केले आहे.

बाजारात मिर्चीला १ रुपया किलोने भाव मिळत आहे, हा काय भाव आहे का? व्यापाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे. केंद्र सरकार झोपा काढतंय, राज्य सरकार झोपा काढतंय, यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असेही शेतकरी म्हणताना दिसत आहे.

सगळे सरकार सुस्ताड झाले राज्यातले असो वा केंद्रातले. शेतकऱ्याकडे लक्षच द्यायला तयार नाही. अशा इतकी चांगली मिर्ची आहे, तरी व्यापारी १ ते २ रुपये किलोला मागतात त्यांना लाजा वाटायला पाहिजे. या मिर्च्या मी ठेवून तरी काय करु, असेही तो शेतकरी म्हणताना दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज कुंद्रा माझ्या घरी आला आणि मला किस करू लागला, मी बाथरूममध्ये…; शर्लिन चोप्राच्या खुलाश्याने खळबळ
चंद्रकांत पाटील होणार नागालँडचे राज्यपाल?; शिवसेनेने दिल्या शुभेच्छा
वाढदिवस विशेष: जेव्हा मगरीला घरी घेऊन आले होते मोदी, वाचा मोदींबद्दल १० न ऐकलेल्या गोष्टी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.