धक्कादायक! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ’उद्या माझ्या अंत्यसंस्काराला या’ म्हणत शेतकऱ्याची आत्मह.त्या

परभणी | सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा येथे राहणाऱ्या चंद्रकांत भगवान धोंडगे (वय ३०) या शेतकऱ्याने आत्मह.त्या केली आहे. कर्ज आणि सावकारांकडून येणाऱ्या धमक्यांना कंटाळून तरुण शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत चंद्रकांत यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर आत्मह.त्या करत असल्याचे जाहीर केले होते.

तरुण शेतकरी चंद्रकांत धोंडगे यांनी मंगळवारी दुपारी १२: २३ वाजेच्या सुमारास व्हॉट्सअ‍ॅपवर तीन स्टेटस पोस्ट केले. यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, ‘माझी उद्या माती आहे. सर्वांनी यावे. मला पैश्यांमुळे धमक्या येत आहेत, म्हणून मी आत्मह.त्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा’.

दरम्यान, पैशांमुळे मला त्रास झाला, अशा आशयाच्या चीठ्यांचे फोटो स्टेटसवर ठेवले. तसेच यानंतर या शेतकऱ्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. अशाप्रकारचे स्टेटस चंद्रकांत यांनी ठेवल्याची माहिती मिळताच त्यांचे चुलते हनुमान धोंडगे यांनी शेताकडे धाव घेतली.

चंद्रकांत याला शेतातून दुपारी १:३५ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चंद्रकांत यांना मृत घोषीत केले. या घटनेचा पुढील तपास सोनपेठ पोलीस करत आहेत. तरुण शेतकऱ्याच्या आत्मह.त्येनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरे इन ॲक्शन; बालेकिल्ला सावरण्यासाठी नेमला ‘हा’ जुना व खास शिलेदार
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर
सात-बारा उताऱ्यातील ‘या’ नव्या बदलामुळे शेतकऱ्यांना होणार मोठा आर्थिक फायदा, असा करा अर्ज
शेतकरी आंदोलन! ‘अनेक नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत’; एका ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.