शेतकऱ्याची झाली चांदी! दीड एकरात केली द्राक्षांची लागवड, आता मिळतेय तीन लाखांचे उत्पन्न

खचून न जाता संकटांचा सामना कसा करावा हे शेतकऱ्याकडून शिकावे. मागील काही वर्षांपासून सिंदखेड राजा तालुक्यामध्ये दुष्काळाने हाहाकार माजवला होता. तरीसुद्धा तेथील शेतकऱ्यांनी न डगमगता इच्छाशक्तीच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली.

बरेच शेतकरी फळबागांकडे वळत असल्याचे दिसत आहे. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील शेलगांव राऊत या गावातील शेतकरी बबन शेषराव राऊत हे आहेत. फळबागामुंळे शेतकऱ्यांना खुप फायदा होताना दिसत आहे.

शेषराव यांनी दीड एकरमध्ये द्राक्षांची लागवड केली आहे. त्यातून त्यांनी ३ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यातून त्यांना दीड ते दोन लाख रूपये नफा होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे दीड एकर जमीन होती.

दीड एकरमध्ये त्यांनी नाशिकवरून १४०० द्राक्षांची रोपे १५ रूपये किमतीने आणली होती. त्यानंतर त्यांनी ९ बाय ४ वर द्राक्षांची लागवड केली होती. कृषी विभागाकडून ३० बाय ३० चे शेततळे मंजूर झाले. परंतु त्यांना त्यातील पाणी पुरत होते.

मग त्यांनी स्वता खर्च करून १२५ बाय १२५ लांबी, रूंदी व २५ फूट खोली करून द्राक्ष बगीचाला पुरणारे पाणी कृषी विभागांच्या योजनेतून व स्वखर्चातून उपलब्ध केले. त्यांनी द्राक्षांची लागवड केल्यानंतर त्यांना १० ट्रॉली शेणखत टाकले होते.

तर दुसऱ्या किंवा चौथ्या दिवशी फवारणी केली जाते. आता त्यांच्या द्राक्षाच्या झाडाला जवळपास १५ ते २० किलो द्राक्षे आहे. पहिल्याच साली त्यांनी १०० क्विंटल द्राक्षांचे उत्पादन मिळवले होते.

यावर्षी साधारणपणे त्यांना १२५ क्विंटलपेक्षा जास्त द्राक्षे मिळण्याची आशा आहे. यावर्षी द्राक्षातून त्यांना ३ लाखांचे उत्पादन मिळणार आहे. त्यातील सगळा खर्च वगळला तर निव्वळ १.५ ते २ लाखांचा त्यांना नफा होणार आहे.

त्यांनी शेततळ्यामध्ये मत्स्यबीज खरेदी केले आहेत. हे विविध जातींचे मत्स्यबीज त्यांनी तळ्यात सोडले आहेत. त्यांना दररोज खाद्य टाकले जाते. शेततळ्यात एक हजार मत्स्यबीज टाकण्यात आले आहेत.

माशांची योग्य वाढ होण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपाऊंड, जाळी, खांब बसविले आहेत. बबन यांनी सांगितले की एका माशाचे वजन एक किलोपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता ते मत्स्य व्यवसायातूनही पैसा कमवत आहेत.

महत्वाच्या बातम्या
‘कुछ तो गडबड है’ म्हणत गाजवला छोटा पडदा, वाचा बँकेतला एक रोखपाल कसा बनला कलाकार
या देशात राहतात जगातील सर्वात यशस्वी महिला; कमाई पण करतात पुरुषांपेक्षा दुप्पट
तस्मानियन डेविल: विलुप्त झालेला सर्वात खतरनाक प्राणी, ३ हजार वर्षांनंतर दिसून आला जंगलात
गॅंगस्टर गजा मारणेला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपच्या माजी खासदाराला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.