शिक्षण फक्त १२ वी पास, पण कमवत आहे लाखो रूपये, वाचा असा कोणता व्यवसाय करते ही महिला

आजपर्यंत तुम्ही अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या असतील पण ही यशोगाथा जरा वेगळी आहे. अशा खुप कमी महिला आहेत ज्या आज शेतीतून भरघोस कमाई करत आहेत. शक्यतो महिला शेतीकडे वळत नाहीत पण भारतात तुम्हाला अशा अनेक महिला सापडतील.

असे एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत नाहीत. त्यातल्या त्यात शेती म्हणलं की कष्ट हे आलेच.आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत ज्या आज शेतीतून लाखो रूपयांची कमाई करत आहेत.

आज त्या अनेक महिलांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांची यशोगाथा. जर तुम्हाला नोकरी चांगल्या पगाराची असेल तर असा एकही व्यक्ती सापडणार नाही जो शेतीकडे वळेल. किंवा तुमचे शिक्षण चांगले नसले म्हणून काय झाले तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला ज्या गोष्टीत अनुभव आहे त्या गोष्टीत तुम्ही यशस्वी होऊ शकता.

पण आता जग बदलत चालले आहे. या बदलत्या जगात काही लोक असेसुद्धा आहेत जे आपल्या जिद्दीच्या आणि स्वप्नांच्या जोरावर वेगळा रस्ता पकडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत. त्या महिलेचे नाव आहे सुलाफत मोईदीन. त्या केरळमधील रहिवासी आहेत.

असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीने काही करण्याचा निर्णय घेतल्यास तो आपला मार्ग स्वताच तयार करतो. अशीच कथा आहे केरळच्या सुलाफत मोईदीनची. एर्नाकुलममधील एडावणक्क या गावात राहणाऱ्या सुलाफत यांना शेतीची अशी काही आवड निर्माण झाली की त्यांनी आपल्या घराच्या छतालाच आपले कमाईचे साधन बनवले.

त्यांनी हे दाखवून दिले की शेती फक्त जमीनीवरच नाही तर छतावरही करता येते. 2020 मध्ये त्यांना केरळच्या सर्वश्रेष्ठ टेरेस किसान हा सन्मान देण्यात आला होता त्यामुळे यावरून सुलाफत यांच्या कार्याचा अंदाज येऊ शकतो.

24 वर्षांपासून सेंद्रिय शेतीसाठी सुप्रसिद्ध सुलाफत यांनी आपल्या दोन हजार चौरस फूट टेरेस शेतात रूपांतरित केले आहे. जिथे जवळजवळ 1000 ग्रो बॅग आणि कुंड्या आहेत. ज्यामध्ये फळे, हंगामी भाज्या, सलाद, मसाले, इत्यादींचा समावेश आहे.

त्या त्यांच्या गच्चीवर कांदा, आले, हळद, पुदीना, कोथिंबीर, मका, एका जातीची बडीशेप इत्यादी पिकवते आणि बाजारात विक्री करुन त्यातून मोठा नफा कमावते. मीडिया रिपोर्टनुसार ती महिन्यात वीस हजारांपर्यंत कमावते.

खास गोष्ट अशी की सुलाफत फक्त 12 वी पास आहे. असे असूनही, ज्या पद्धतीने तिने सेंद्रिय खत वापरुन नवीन पद्धती तयार करण्यास सुरुवात केली आणि नफा कमावला, तो प्रेरणादायक आहे. सुलाफत ‘सुलाफात ग्रीन डायरी’ नावाचे एक यूट्यूब चॅनल देखील चालवते, ज्याद्वारे ती लोकांना शेतीसाठी नवीन पद्धती शिकवते.

46 वर्षांची सुलाफत अशा लोकांसाठी प्रेरणा आहे ज्यांच्याकडे स्वताची शेती नाही किंवा शेती करण्यासाठी जागा नाही. एक व्यवसाय म्हणून आणि एक छंद म्हणून आपण आपल्या गच्चीवर एक छोटीशी शेती करून भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.

सुलाफत अशा लोकांना मदत करते. त्यांना मार्गदर्शन करते. तसेच कोणकोणती रोपे लावावीत आणि ती रोपे कोठे मिळतात याचीही माहिती ती देते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
बाप तो बापच असतो! मुलासाठी ५ एकराची द्राक्षाची बाग काढून त्याजागी उभारले क्रिकेटचे मैदान
शेतकऱ्याचा नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये पोराला क्रिकेट खेळता येईना, पाच एकरात उभारले स्टेडियम
‘रमता जोगी’वर तीन पोरींनी केलेला हा डोळ्याचं पारण फेडणारा डान्स पाहून तुमचेही पाय थिरकतील
राज्याच्या पोलीस दलात प्रचंड खळबळ! खुनाच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षकांसह ३ जणांना अटक; एक फरार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.