पांरपारिक शेतीला फाटा देत केली श्रीलंकेच्या कोलंबस नारळाची शेती, कमावतोय १० लाख

तुम्ही अशा अनेक शेतकऱ्यांबद्दल ऐकले असेल ज्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत वेगळा रस्ता धरला आणि भरघोस नफा कमावला आहे. अशा अनेक यशोगाथा रोज तुमच्या कानावर पडल्या असतील. शेतकऱ्यांनी जर माहिती काढून एखाद्या तज्ञ किंवा प्रगतीशील शेतकऱ्याचा सल्ला घेऊन शेती केली तर नक्कीच त्यांना फायदा होईल याच शंका नाही.

तसेच पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर शेतकरी चांगला नफा कमवू शकतो. अशाच एका शेतकऱ्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याने पारंपारिक शेतीच्या ऐवजी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला आणि आज हा शेतकरी पुर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील अठवडी गावच्या शेतकऱ्याने नारळाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने ऊस, गहू, बाजरी कडधान्य यांचे उत्पादन घेण्याचे टाळले. त्यांनी कोलंबस जातीच्या नारळाची शेती केली आहे.

या कोलंबस जातीच्या नारळाला जवळपास १००० ते १२०० नारळ पाच वर्षाला येतात त्यामुळे शेतकऱ्याचा खुप फायदा होतो. कोलंबस नारळ हा मुळचा श्रीलंकेतील आहे. या शेतकऱ्याने याचे कलम हे भारतात मागवून घेतले.

महाराष्ट्रात हे रोप आणल्यानंतर त्याच्यावर आणखी प्रक्रिया केली जाते आणि ते या वातावरणात उगवण्यासाठी तयार होते. चांगल्या प्रकारे विकसित केल्यानंतर ते शेतकऱ्याच्या घरी विकण्यासाठी पोहोचवले जाते. या झाडाच्या पुर्ण वाढीसाठी आणि उत्पन्न मिळण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी जातो.

यातून शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो. भारतातल्या नारळापेक्षा या नारळाची वाढ लवकर होते. कमी वेळेत जास्त नफा मिळवायचा असेल तर हा नारळ उत्तम पर्याय आहे. पाच वर्षांच्या कालावधीत या नारळाला १००० ते १२०० नारळ येतात. इतर नारळाच्या झाडांना शक्यतो १५ ते २० नारळ येतात.

या नारळाची खासियत अशी आहे की याला अगदी कमी पाणी लागते. तसेच महाराष्ट्रातील वातावरणात याची चांगल्या प्रकारे वाढ होते. पाणी कमी असलं किंवा जास्त असलं तरी याची वाढ होते. तुम्ही कोठेही याची लागवड करू शकता.

तसेच याची उंची कमी असल्याने नारळ तोडताना शेतकऱ्याला जास्त त्रास होत नाही. या नारळाच्या पाण्याची चव ही गोड असते आणि खाण्यासाठीही हा नारळ चांगला लागतो. याच्या खोबऱ्याची गुणवत्ता चांगली असते.

संतोष गर्जे याची लागवड कशी करावी याची सगळी माहिती शेतकऱ्यांना देत असतात. ४.५ ते ५ फू़ट उंचीचे कोलंबस नारळाचे कलम केले रोप हे दीड वर्षांचे असते. त्याला खाली सात किलोची पिशवी असते. याच्या एका रोपाची किंमत ही ३०० रूपये असते.

५०० रूपयांच्या रोपांची उंची ८ फुट असते आणि त्याला १० किलोची पिशवी असते. या झाडाचे वय २ वर्षे असते. या कोलंबस नारळाच्या शेतीतून शेतकऱ्याला एकरी दहा लाखांचे उत्पादन दर पाच वर्षानंतर मिळते. मार्केटिंगची चांगली माहिती जर घेतली तर याला चांगला भाव मिळतो.

या नारळाची बाजारपेठेत खुप मागणी आहे. संतोष गर्जे यांनी कोलंबस नारळाची रोपे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. अगदी कमी किंमतीत ते ही रोपे घरपोच पोहचवतात. अगदी बाहेरच्या राज्यातून त्यांच्या रोपांना मागणी आहे.

जे शेतकरी शंभरपेक्षा जास्त रोपे घेतात त्यांना घरपोच रोपे दिली जातात. दरवर्षी त्यांना एक ते दीड लाख रोपांची ऑर्डर असते. पारंपारिक शेतीसोबत ते कोलंबस नारळाची शेती करत भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
कोणत्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती मिळतो पगार? उत्तर प्रदेश आहे तिसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्र….
“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”
परीक्षा रद्द झाली म्हणून मुलाने काढले चंद्राचे फोटो; फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
परवीन बॉबीला भेटण्यासाठी आलेला विदेशी चाहता कसा बनला बॉलीवूडचा खलनायक? वाचा बॉब क्रिस्टोची कहानी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.