मी फक्त नावाला शेतकरी! कपाशीतून कमावतो १९ रुपये, वाचा तो व्हायरल मेसेज..

शेतकरी म्हटले की आजकाल आपल्या समोर एक वेगळेच चित्र समोर येते. अनेक वेगवेगळ्या प्रकारची संकटे त्याच्यावर येत असतात. अशीच एक शेतकऱ्यांची करूण कहाणी सादर करणारा कपाशी या पिकाचा मेसेज व्हायरल होत आहे.

यामध्ये कपाशीमध्ये वर्षाला मिळणारे उत्पन्न व त्यातून वजा केलेला उत्पादन खर्च पाहता एका शेतकऱ्याला दिवसाला फक्त १९ रुपये शिल्लक राहतात हे हिशोबानीशी दाखविले गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

यामुळेच शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेती व्यवसाय करावा तरी कसा असा प्रश्न शेतकरी वर्ग प्रशासनाला विचारत असून उत्पादन खर्चावर पिकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करत आहे.

या मसेजमध्ये एक एकर कपाशीची शेती करत आहे. नांगरणी ते शेतातील शेवटचे खुंट बाहेर काढण्यापर्यंत लागलेल्या खर्चाचा हिशोब एका शेतकरी पुत्राने आलेखाच्या साहाय्याने मांडले असता एकरी ३०९०० रुपये खर्च येत आहे.

एकरी बारा क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले व भाव चार हजारापर्यंत पकडला तरी ४८ हजारातून जवळपास ३१ हजार रुपये खर्च जात असतांना केवळ शेतकऱ्यांकडे नफा हा १७ हजार रुपये मिळत आहे.

यामुळे सर्व हिशोब करता महिन्याला शेतकऱ्याला १४११ तर दिवसाला १९ रुपये शुद्ध नफा मिळतो हेच यातून स्पष्ट होत आहे. यावर कसे जगायचे आणि कसा खर्च भागवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या खर्चाशिवाय शेतातील विजपंपाचे बिल व स्वतः शेतकऱ्यांची रात्रंदिवसाची मेहनत बघितली तर असा तोट्याचा धंदा फक्त शेतकरीच करू शकतो. हे यातून स्पष्ट होत आहे. यामुळे सरकारने या पिकाकरिता कमीत कमी ७ हजार रुपये भाव तरी द्यावा अशी मागणी करण्याकरिता व्हायरल मेसेजच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.