शेतकऱ्याचा नादच खुळा! लॉकडाऊनमध्ये पोराला क्रिकेट खेळता येईना, पाच एकरात उभारले स्टेडियम

शेतकरी काय करता येईल सांगता येत नाही. कोरोनाच्या काळात असे अनेक शेतकरी होते ज्यांनी भरघोस नफा मिळवला. पण तुम्हाला वाटत असेल की शेतकरी फक्त शेतीच करतो तर तुम्ही चुकीचे आहात. कारण पंढपुरात एका शेतकऱ्याने आपल्या मुलासाठी चक्क शेतात क्रिकेटचे मैदान उभारले आहे.

लॉकाडाऊनमध्ये पोराला क्रिकेट खेळता येईना म्हणून त्यांनी आपली पाच एकरची द्राक्षाची बाग काढून टाकली आहे आणि त्याजागी आता क्रिकेटचे मैदान बांधण्यास सुरूवात केली आहे. याला मैदान म्हणता येणार नाही कारण हे एक भलेमोठे स्टेडियम आहे.

पंढरपुरच्या बाळासाहेब सुर्यवंशी यांनी हा कारनामा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मैदानावर पाच खेळपट्ट्या असणार आहेत. काही बाप आपल्या पोरांना साधी क्रिकेटची बॅट घेऊन देऊ शकत नाही पण सुर्यवंशी यांनी आपल्या पोरासाठी थेट स्टेडियम उभारले आहे आणि ते ही आपल्या शेतात.

पण त्यांनी हे फक्त आपल्या मुलासाठी केलेले नाही. या स्टेडियममुळे आता पंढरपुरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक खेळाडू येथे सराव करू शकतात. सुर्यवंशी यांचा मुलगा चांगला क्रिकेट खेळतो त्याचे स्वप्न क्रिकेटर होण्याचे आहे.

मग काय मुलासाठी कायपण म्हणत बाळासाहेबांनी कामाला सुरूवात केली आणि पाच एकरातली द्राक्षाची बाग हटवली आणि स्टेडियम उभारायला सुरूवात केली. स्टेडियमचे काम चालू आहे आणि आर्धे कामही झाले आहे. त्यांच्या गावातून चांगले क्रिकेटपटू तयार व्हावेत अशी बाळासाहेब सुर्यवंशी यांची इच्छा आहे.

मैदान हिरवेगार करण्यासाठी त्यांनी लॉन आणले आहे. पव्हेलियनचं बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. एवढंच काय येथे वानखेडेचे पिच क्युरेटरसुद्धा येऊन गेले आहेत. ५० पेक्षा जास्त माणसे येथे रोज कामाला असतात. बाळासाहेब सुर्यवंशी यांची चर्चा सध्या पुर्ण महाराष्ट्रात होत आहे.

महत्वाच्या बातम्या
एकेकाळी रस्त्यावर पिशव्या विकायचा, आज आहे २५० कोटींचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास
इंडियन आयडल: पवनदीप राजनच्या अफलातून डान्सवर फिदा झालेल्या जज अनु मलिक यांनी काय केलय बघा..
मोदींनी केली मोठी घोषणा! कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मिळणार १० लाख रुपये आणि मोफत शिक्षण
शिवशक्ती भीमशक्तीची जोडी जमली; मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना प्रकाश आंबेडकरांची साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.