शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत; अजित पवारांनी स्पष्ट शब्दात खडसावले

मुंबई : ‘शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असल्याने कर्जमाफी दिली होती. मात्र, महावितरण कंपनी टिकवायची असेल तर या पुढे वीज देयक भरावे लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे भाषेत सांगितले आहे. महाविरण कंपनी टिकवून ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी वसुली आणि त्यावर होणारा पायाभूत विकास यावर विभागीय आयुक्तांनीही देखरेख ठेवावी अशा सूचनाही अजित पवारांनी दिल्या आहेत. राज्यात कृषिपंपाची ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून मराठवाड्यात ती १५ कोटी रुपये एवढी आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी थकबाकीतील दंड आणि दंडव्याज यात सवलत दिली आहे. त्यापोटी पाच हजार कोटी रुपयांची मदत झाली आहे. पण यापुढे जेवढी रक्कम भरली जाईल तेवढी रक्कम त्याच जिल्ह्यातील महावितरणच्या पायाभूत विकासावर खर्च केले जातील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, ते म्हणाले की, राज्यात कृषिपंपधारकांकडे ४५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी राज्य शासनाने १५ हजार कोटी रुपयांचे व्याज व दंड माफ केला जाणार आहे. उरलेल्या ३० हजार कोटींपैकी १५ हजार कोटींच्या बिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे.

मराठवाड्यात १० हजार कोटींपैकी ५ हजार कोटींच्या वीजबिलाचा भार राज्य सरकारने उचलला आहे. आता राहिलेले राज्याचे १५ हजार कोटींचे वीजबिल आणि मराठवाड्याचे ५ हजार कोटींचे वीजबिल टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांनी तातडीने भरले पाहिजे, असेही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
रिहानाचा टॉपलेस फोटो आणि गळ्यातील पेंडेंट पाहून राम कदम संतापले, म्हणाले…
मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार? मोहन भागवतांनी घेतली मिथुन चक्रवर्ती यांची भेट
..म्हणून रिक्षाचालकाने परत केले चाळीस लाखांचे दागिने; किस्सा वाचून तुम्हाला कौतुक वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.