शेतकऱ्याने एखादी गोष्ट मनावर घेतली की तो काहीही करू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून समोर आलं आहे. बीड जिल्हयातील पाडळसिंग गावाच्या एका शेतकऱ्याने चक्क २ कोटी रुपये खर्च करून विहीर बांधली आहे. या शेतकऱ्याचे नाव मारुतीराव बजगुडे असं आहे. या शेतकऱ्याच्या विहिरीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे.(Farmer in beed spend 2 corer rupees on well)
मारुतीराव बजगुडे या शेतकऱ्याने २ कोटी रुपये खर्च करून एक एकर परिसरात विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी दररोज ८० मजूर काम करत होते.१२ हायवा आणि ८ जेसीबी एवढी यंत्रे सलग ३ वर्षे या विहिरीचं काम करत होते. ही विहीर साधारण १५० ते २०० फूट खोल आहे. या विहिरीमुळे मारुतीराव बजगुडे यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
मारुतीराव बजगुडे यांच्या विहिरीची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा असल्याने हे नागरिकांसाठी पर्यटनस्थळ बनले आहे. ही विहीर पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. पाडळसिंग गावात मारुतीराव बजगुडे यांची १२ एकर शेती आहे. सतत दुष्काळ पडत असल्याने त्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. पाण्याच्या टंचाईमुळे शेतीच्या उत्पादनात घट होत होती.
यावर उपाय म्ह्णून मारुतीराव बजगुडे यांनी शेततळे तयार करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाण्याचा मर्यादित साठा राहील म्हणून त्यांनी शेततळ्याऐवजी त्यांनी मोठी विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षांपासुन या विहिरीचे काम सुरु होते. आता ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे मारुतीराव बजगुडे यांची १२ एकर शेती ओलिताखाली आली आहे.
या विहिरीमध्ये सुमारे १० कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. जरी दोन वर्षे पाऊस पडला नाही, तरी या विहिरीच्या पाण्यामध्ये सुमारे शेतीचे ५० एकर क्षेत्र भिजू शकते. यामुळे मारुतीराव बजगुडे यांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यांनी ८ एकर क्षेत्रात मोसंबी पिकाची लागवड केली आहे. यामुळे मारुतीराव बजगुडे यांना मोठा फायदा मिळणार आहे.
शेती व्यवसायात पाणी हा शेतकऱ्यांसमोरील मोठा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. शेतकरी विहीर, बोर आणि शेततळ्यांचा आधार घेतात. पण दुष्काळात शेतकऱ्यांसमोर पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बीड जिल्ह्यातील शेतकरी मारुतीराव बजगुडे यांनी लढवलेल्या युक्तीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
भारतात समान नागरी कायदा लागू होणार? वाचा काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन
संजय राऊतांनी भाजपवर धडाडल्या तोफा; केले ‘हे’ गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
डॉक्टरांनी घडवले माणुसकीचे दर्शन, निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन केले मोफत उपचार