चर्चा तर होणारच! भावाने आंब्याला ऊन, रोगापासून वाचविण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

आपण आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला एका शेतकऱ्याचा जुगाडाबद्दल सांगणार आहोत. आता सध्या आंब्याचा मौसम चालू झाला आहे.

त्यामुळे शेतकरी आपल्या आंब्यांच्या फळबागांचे ऊन आणि रोगांपासून संरक्षण करत आहेत. हे करताना अनेक शेतकरी वेगवेगळ्या आयडिया वापरत आहेत. अशीच एक आयडिया चिखलगोठण येथील शंकर गणपती पवार यांनी वापरली आहे.

त्यांची ही आयडिया आता सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. कारण पवार यांनी आपल्या बागेत आंब्याच्या फळाला कागदी पिशव्यांचे आवरण घातले आहे. आता ऊन्हाची तिव्रता वाढू लागली आहे.

देवगिरी, कोकणी, हापूस आंब्याप्रमाणेच ग्रामीण भागात केशरसह संकरित वाणाचे दर्जेदार आंबा उत्पादन घेतले जात आहे. आता चांगल्या आलेल्या आंब्याचे नुकसान होऊ नये किंवा त्यांना किड लागू नये यासाठी पवार यांनी चक्क आंब्याला संरक्षण म्हणून कागदी पिशव्यांचे आवरण घातले आहे.

त्यांनी तब्बल २३०० रोपांची लागवड केली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण त्यांनी १२ टन आंब्यांच्या फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घातले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मागील दोन वर्षांत आंब्याच्या फळाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते.

यंदा फळांची लागण चांगली झाली आहे. त्यामुळे उन्हापासून त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कागदी पिशव्यांच्या आवरणाची उपाययोजना केली आहे, असे पवार म्हणाले आहेत. त्यांच्या या जुगाडाची चर्चा सगळीकडे पसरली आहे.

अनेक शेतकरी त्यांचा हा जुगाड आपल्याही पिकांचे संरक्षण करण्यासाठी वापरत आहेत. आपण अनेक शेतकऱ्यांना अनेक जुगाड करताना पाहिले आहे. शेतकरी जरी शिकलेला नसला तरी तो आपल्या अनुभवाच्या जोरावर काहीही करू शकतो हे खरे आहे.

महत्वाच्या बातम्या
मिसळप्रमींनो! मिसळचा शोध कसा लागला माहितीय का? जाणून घ्या..
७० हजारांना रेमडेसिवीर विकत मेडीकलवालाच करत होता काळाबाजार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबले नसते; तर मयुरसह त्या मुलाचाही गेला असता जीव; वाचा पडद्यामागची कहाणी
साधा वेटर ते ४५० हॉटेलचे मालक, वाचा विठ्ठल कामत यांचा प्रेरणादायी प्रवास

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.