शेतात काहीतरी चमकताना दिसलं आणि…; शेतकरी झाला मालामाल

जगप्रसिद्ध हिऱ्याच्या खाणी असणाऱ्या मध्य प्रदेशतील पन्ना जिल्ह्यात एका शेतकऱ्याचे नशीब फळफळले आहे. येथील एका शेतकऱ्याला ६० लाखाचा हिरा सापडला आहे. त्याचे नाव लखन यादव आहे. लखन यादवला नशीबाने अशी काही साथ दिली की, तो आज लखपती आहे.

गेल्या महिन्यात लखन यादव यांनी २०० रुपये भाडेतत्त्वावर ही जमीन घेतली होती. लखनला त्याच्या जमिनीवर काही चमकणारी वस्तू दिसली ज्यामध्ये खोदताना १४.९८ कॅरेटचा हिरा सापडला. यानंतर खनिज विभागाने ६०. लाख रुपयांमध्ये या हिऱ्याचा लिलाव केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना लखन यादव म्हणाले, “त्या हिऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. हिरा नजेरला पडला तो, क्षण मी कधीच विसरु शकत नाही. खोदकाम करताना दगडांमध्ये विलक्षण चमकणारी एक वेगळी वस्तू दिसली”.

तसेच “काही तरी मोठे मिळेल म्हणून मी गेलो नव्हतो. माझे शिक्षण झालेले नाही. माझ्या चार मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी मी हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार आहे.” यानंतर लखनने त्याची ही कहाणी सोशल मीडियावरही शेअर केली होती. नेटकऱ्यांनी याला खूप पसंती दिली आहे. त्याचा एक फोटोही यामध्ये व्हायरल झाला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका! कोरोनाने घेतला अभिनेत्रीचा बळी

…याला म्हणतात बेहती गंगा मे हाथ धोना, फडणवीसांचा हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.