शेतकऱ्याचा नादखुळा! शेतकरी उद्योजकाने खरेदी केले हेलिकॉप्टर…

मुंबई | हौसेला मोल नसतं हेचं खरं.. कोणाला महागड्या गाड्यांच वेड असत तर काहींना सोने-चांदीच असत. भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वाना अचंबित केले आहे.

भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसाया निमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी नव्या व्यवसायाचे धाडस केले.

त्यानंतर भोईर यांना स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते. तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सर्व सुखसुविधा असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
उदयनराजे म्हणतात, ‘शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण….’
नीट बोलायचं असतं, चंद्रकांत पाटलांची गोपीचंद पडळकर यांना जाहीर समज…
‘पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.