देशातील शेतकरी सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकरी कमीत-कमी जमिनीचा वापर करत पिकाचे उत्पादन वाढवत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेतकरी आता पारंपरिक पद्धतींना छेद देत आधुनिक पद्धतींचा शेतीमध्ये वापर करू लागले आहेत.(farmer earn 7 lakhs by this crop on 20 hector land )
महाराष्ट्रामधील(Mahrashtra) सोलापूर(Solapur) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मिश्र शेतीचा उपयोग करत बक्कळ उत्पन्न मिळवले आहे. या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव रामचंद्र चोपडे असं आहे. या शेतकऱ्याने वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड केली होती. रामचंद्र यांच्या शेतीतील कलिंगड आणि मिरचीच्या पिकांना सुरवातीला अळी व भुरी लागली होती.
पण रामचंद्र चोपडे यांनी योग्य नियोजन करत अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात लावलेल्या मिरचीच्या पिकातून तब्बल सात लाखांचे उत्त्पन्न मिळवले आहे. त्यामुळे सर्वत्र शेतकरी रामचंद्र चोपडे यांचे कौतुक होत आहे. रामचंद्र चोपडे हे पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्यात नोकरी करतात. नोकरी करत असताना देखील त्यांनी शेतीची आवड जपली होती.
त्यांनी नोकरी आणि शेतीत योग्य समतोल साधत मोठे यश मिळवले आहे. रामचंद्र चोपडे नेहमीच आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. यावेळी त्यांनी आपल्या शेतात मिश्र शेतीचा प्रयोग केला. प्रगतिशील शेतकरी रामचंद्र चोपडे यांनी आपल्या शेतात कलिंगड आणि मिरची या दोन पिकांची लागवड केली. या पिकांना पाणी देण्यासाठी रामचंद्र यांनी ठिबकसिंचनाचा वापर केला.
रामचंद्र चोपडे यांच्याकडे चार एकर बागायती शेती आहे. अल्पभूधारक असताना देखील त्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून पिकांचे उत्पादन वाढवले आणि बक्कळ नफा कमवला. प्रगतिशील शेतकरी रामचंद्र चोपडे आपल्या शेतात वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची देखील लागवड करतात. रामचंद्र चोपडे यांना एक स्वप्नील नावाचा मुलगा आहे. तो देखील रामचंद्र यांना शेतीत मदत करतो.
कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड करत असताना रामचंद्र यांना अनेक समस्यांना समोर जावं लागलं. सुरवातीला कलिंगड आणि मिरची या पिकांवर अळी व भुरी लागली होती. त्यानंतर रामचंद्र यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत औषधांची फवारणी केली. वीस गुंठे क्षेत्रात कलिंगड आणि मिरची या पिकांची लागवड करण्यासाठी रामचंद्र यांना ७० हजार रुपये खर्च आला होता.