वावर आहे तर पावर आहे! कोवीड सेंटरसाठी शेतकऱ्याने दिली १४ एकर शेती

नांदेड । राज्यासह देशावर देखील सध्या कोरोनाचे संकट आले आहे. रोज रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. आताअसाच एक शेतकरी आता मदतीसाठी पुढे आला असून आपली शेती कोविड सेंटरसाठी देण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.

रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून जास्तीत जास्त कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदेड शहरापासून १४ किमी अंतरावर स्वप्नील सूर्यवंशी यांची शेती आहे. आपली ही शेती आपण कोविड सेंटरसाठी विना मोबदला देण्यास तयार असल्याचे स्वप्नील यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा का म्हटले जाते, याची प्रचिती येते. स्वप्नील हा शेतकरी स्वप्नील हे नांदेश शहर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

देशावर संकट आले असताना अनेकदा शेतकरी पुढे असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले आहे. सध्या संपूर्ण देश कोरोनाशी दोन हात करत आहे. मात्र आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला असून रुग्णांना बेड देखील उपलब्ध नाहीत.

ऑक्सिजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन वैद्यकीय यंत्रणा कमी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

परिस्थितीत हाताबाहेर चालली आहे. यामुळे आता कडक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्हाबंदी देखील केली जाऊ शकते. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्याची झाली चांदी! दीड एकरात केली द्राक्षांची लागवड, आता मिळतेय तीन लाखांचे उत्पन्न

मुलगी न्यासामूळे अजय देवगनवर आली होती झोपेच्या गोळ्या खायची वेळ; जाणून घ्या कारण

केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.