पाच मुलींचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा, लाडक्या बाबांना दिला शेवटचा निरोप

वाशिम । वडिलांच्या निधनानंतर मुलांनी खांदा देण्याची हिंदू परंपरा अनेक दिवसांपासून चालत आली आहे. मात्र या परंपरेला फाटा देऊन वाशिम जिल्ह्यातील धोत्रा माळी येथील लक्ष्मराव इंगळे यांच्या पार्थिवाला पाच मुलींनी खांदा दिला आहे.

लक्ष्मणराव इंगळे यांच्या दोन्ही मुलांचे निधन झाल्यामुळे त्यांचा मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. लक्ष्मणराव यांनी आपल्या मुली आणि मुलांना सुशिक्षित केले. परिसरातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात ते कायम हजर राहत होते. लक्ष्मणराव इंगळे हे दूध आणि भाजीपालाचा व्यवसाय करत होते.

मात्र , लक्ष्मराव इंगळे याचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. लक्ष्मराव यांना २ मुले आणि ८ मुली यापैकी दोन मुलींचे आणि दोन मुलांचे निधन झाले. त्याअगोदर त्यांच्या पत्नी अलोका यांनीही अकाली जगाचा निरोप घेतला होता.

मात्र लक्ष्मराव इंगळे त्यांच्या मुलांना आईची कमतरता भासू दिली नाही. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुले नसल्यामुळे मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याने संपूर्ण गावात त्यांच्या विषयी चर्चा सुरू आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

काळेंना १२ मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला होता. यामुळे चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

‘या’ इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

इंडिअन आयडल १२: अरुणीता कांजीलालनं गायलं राणू मंडलचं गाणं, हिमेश रेशमियाला झाले अश्रू अनावर

भाजपला मोठे खिंडार; एकाच वेळेस १५ भाजप नेत्यांनी दिला राजीनामा

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.