चाहत्याने जान्हवी कपूरला किस करण्याची इच्छा केली जाहीर; जान्हवीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सध्याच्या घडीला जान्हवी कपूर इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. तिने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये चांगलेच यश मिळवले आहे. तिचा चाहता वर्ग देखील खुप मोठा आहे. त्यामूळे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

जान्हवी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संपर्कात असते. एवढेच नाही तर ती अनेकदा लाईव्ह येते. या वेळेस जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अस्क मी एनीथींग (Ask Me Anything ) सेशन ठेवला होता.

या सेशनमध्ये चाहत्यांनी जान्हवीला अनेक प्रश्न विचारले. तर त्यासोबत अनेकांनी तिचे भरभरुन कौतूक केले. तिने खुप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण केल्यामूळे तिचे कौतूक करण्यात आले. तिला अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले.

पण यात सर्वात जास्त चर्चा एका प्रश्नाची होत आहे. एका फॅनने जान्हवीला किस करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवीने मास्क घातलेला एक फोटो पोस्ट केला आणि त्या फोटोला नो असे कॅप्शन दिले.

जान्हवीच्या या भन्नाट उत्तराचे सगळीकडून कौतूक होत आहे. तिच्या चाहत्यांना तिचे हे उत्तर खुप आवडले आहे. ‘रुही’ हा जान्हवीचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर लवकरच ती ‘गुड लक जेरी’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

नेपोटिझम किंग करण जोहर परत एकदा स्टार किडला करणार लॉन्च; जाणून घ्या कोण आहे ती स्टार

किड

वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर व्हिडीओ शेअर करत कंगनाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; पहा व्हिडीओ

१३ वर्ष मोठ्या आणि विवाहीत नसीरुद्दीनच्या प्रेमात पडल्या होत्या रत्ना पाठक

७० च्या दशकामध्ये ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीसोबत शशी कपूरने दिला होता पहीला न्यूड सीन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.