भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सौरव गांगुलीने सोशल मीडियावर ट्विट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने बुधवारी ट्विट करून संपूर्ण जगात खळबळ माजली होती.
सौरव गांगुलीने ट्विट केले आहे की, तो काही तरी नवीन लवकरच सुरू करणार आहे. त्यानंंतर सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. सौरव गांगुलीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकांउटवरून ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती.
सोशल मीडियावर सौरव गांगुलीच्या बीसीसीआय अध्यक्षपदाच्या राजनाम्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांने याबद्दल सांगितले आहे की, सौरव गांगुली असे काही करणार नसल्याचे सत्य पुढे आणले आहे.
https://twitter.com/ILoveYouJanu69/status/1531983971071848448?s=20&t=nZ6C_GlR6nLxlVquY8JPEg
सौरव गांगुलीने ट्विटकरत म्हणाला होता की, “माझ्या क्रिकेट प्रवासाला १९९२ मध्ये सुरूवात केली होती. २०२२ मध्ये आता कारर्कीर्दीचे ३० वे वर्ष सुरु आहे. क्रिकेटने तेव्हापासून मला खूप काही दिले आहे. माझ्या क्रिकेट प्रवासामध्ये तुमची मला साथ मिळाली आहे.”
“मी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छितो जो या प्रवासाचा भाग होता. मला पाठिंबा दिला म्हणून मी आज तिथे आहे, मला तिथे पोहचण्यास तुमचही योगदान महत्वाच आहे. आज मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याने मला वाटते की, त्याने बऱ्याच लोकांना मदत होईल. मला आशा आहे की, माझ्या नवीन प्रवासात तुमचा पाठिंबा माझ्या आयुष्यात कायम राहिल.”
जय शहाने सत्य सांगत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. गांगुलीला त्यानंतर चाहत्यांनी ट्विटरवर मीम्स शेअर करत गांगुलीला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. काही चाहत्यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावरही निशाना साधला आहे.
https://twitter.com/A7pha_/status/1531983034601263104?s=20&t=1ny7F2iecTrd6mcBr_JUZg
महत्वाच्या बातम्या:-
कॉंग्रेसमधील सध्याची परिस्थिती चिंताजनक, राहूल गांधी चार वर्षापासून भेटले नाहीत – पृथ्वीराज चव्हाण
पुण्यातील व्हाईट हाऊस ईडीच्या ताब्यात; अभिनेत्री अँजेलिना जोलीने देखील केले होते यामध्ये शूटिंग
‘आता काश्मीर सोडल्याशिवाय पर्याय नाही’; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा