माधूरी दिक्षितच्या नावाने प्रसिद्ध आहे भारतातील ‘हे’ ठिकाण कारण…

बॉलीवूडची धकधक गर्ल माधूरी दिक्षितने एकेकाळी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य केले आहे. तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपट असो डान्स असो किंवा सौंदर्य आजपर्यंत माधूरीला टक्कर देणारी एकही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये आली नाही.

सुपरहिट चित्रपट करुन इंडस्ट्रीमध्ये राज्य करणाऱ्या माधूरीचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. काहीही झाले तरी तिचा चाहता वर्ग कमी होत नाही. ९० चे दशक असो किंवा आजचा काळ माधूरी दिक्षित तेव्हाही चाहत्यांच्या मनावर राज्य करत होती आणि आजही ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

माधूरी दिक्षितचे चाहते तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. अनेकांनी माधूरीसाठी खुप गोष्ट केल्या आहेत. माधूरीचा चाहता वर्ग आणि तिची प्रसिद्ध बघता भारतातील एका पर्यटन स्थळाला माधूरीचे नाव देण्यात आले आहे. जाणून घेऊया त्या स्थळाबद्दल.

भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये एक ठिकाण आहे संगेस्तर स्तोर. या ठिकाणाला माधूरी दिक्षितच्या नावाने ओळखले जाते. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. म्हणूनच या ठिकाणीच्या माधूरी दिक्षितच्या एका गाण्याचे शुटींग झाले होते.

‘कोयला’ चित्रपटातील ‘तन्हाही तन्हाही’ गाण्याची शुटींग या ठिकाणी झाली होती. तेव्हापासून या ठिकाणाला माधूरीचे नाव देण्यात आले आहे. कोयला चित्रपट हिट झाल्यानंतर ते ठिकाणही खुप प्रसिद्ध झाले. अनेक लोकं त्या ठिकाणाला भेटी देऊ लागले. याच कारणामूळे त्याला माधूरीचे नाव देण्यात आले.

८० आणि ९० च्या दशकात आपल्या सुंदरतेने लोकांना घायाळ करणाऱ्या माधूरीचा चाहता वर्ग खुप मोठा होता. तिचे चाहते तिच्यासाठी काहीही करायला तयार व्हायचे. म्हणून तिला बॉलीवूडची लेडी अमिताभ बच्चन देखील बोलले जाते. ती बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आज भलेही माधूरी चित्रपटांपासून दुर आहे. पण लाइमलाईटपासून दुर ती राहू शकत नाही. माधूरी दिक्षित टेलिव्हिजनवर कार्यरत आहे.

माधूरीने ‘अबोध’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर माधूरीला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे कठिण झाले होते. पण तिने हार मानली नाही. ती चित्रपटांसाठी प्रयत्न करत होती. या कालावधीमध्ये तिला तेजाब चित्रपटाची ऑफर आली.

‘तेजाब’ चित्रपट सुपरहिट झाला आणि माधूरी रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटानंतर माधूरीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. तिने अनेक हिट चित्रपट केले आणि ती बॉलीवूडची सुपरस्टार झाली. माधूरीला बॉलीवूडची लेडी अमिताभ बच्चन बोलले जात होते.

माधूरीने तेजाब, बेटा, परींदा, कोयला, अंजाम, हम तुम्हारे हे सनम, देवदास, हम आपके है कौन, दिल तो पागल है अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. फक्त माधूरीच्या नावाने चित्रपट हिट व्हायचे. करिअरच्या टॉपवर असताना माधूरीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

१९९८ मध्ये माधूरीने डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले. लग्नानंतर माधूरी अमेरिकेला स्थायित झाली. तिचे लग्न इंडस्ट्रीसाठी खुप मोठा धक्का होता. पण तिला फरक पडला नाही. ती लग्नानंतर नवऱ्यासोबत सुखी संसारात व्यस्त झाली.

महत्वाच्या बातम्या –
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..
टेलिव्हिजनवरील कलाकारांचे घर फक्त अभिनयाने चालत नाही; म्हणून करतात ‘हे’ काम
करण जोहरच्या एकूण संपत्तीचा आकडा वाचून तुमची झोप उडेल; आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.