आयपीएल(IPL) २०२२ च्या नवीन हंगामाला सुरवात होताच एका नव्या वादाला सुरवात झाली आहे. सोशल मीडियावर काही क्रिकेट चाहत्यांनी कोलकता नाइट रायडर्स या संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकता नाइट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.(Fans demand ban on ‘this’ team in ipl)
यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी करत मुंबई इंडियन्स संघाचा धुव्वा उडवून दिला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर कोलकता नाइट रायडर्स संघाला ट्रोल केले जात आहे. कुलदीप यादव यापूर्वी कोलकता नाइट रायडर्स संघाचा भाग होता.
आयपीएलच्या मागील हंगामात कोलकता नाइट रायडर्सने त्याचा अंतिम संघात समावेश केला नाही. त्यामुळे कुलदीप यादवला जास्त काळ मैदानाबाहेरचं काढावा लागला. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स संघात प्रवेश मिळाल्यानंतर कुलदीप यादवने पहिल्याच सामन्यात आपली कमाल दाखवून दिली आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर कुलदीप यादवचे कौतुक केले जात आहे. तसेच त्याला संघात स्थान न दिल्यामुळे चाहते कोलकता नाइट रायडर्स संघावर संतापले आहेत. क्रिकेट चाहते कोलकता नाइट रायडर्स संघावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात कुलदीप यादवने ४ षटकात फक्त १८ धावा देत ३ बळी घेतले. यावेळी कुलदीप यादवने मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याची देखील विकेट घेतली. आयपीलच्या या हंगामात कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली तर त्याला भारतीय संघात पुन्हा प्रवेश मिळू शकेल.
महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार असताना कुलदीप यादव महत्वाचा खेळाडू होता. संघातील फिरकीपटूची जबाबदारी त्याने उत्तमरित्या पार पडली होती. पण धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर कुलदीप यादवला भारतीय संघातून वगळण्यात आले. विराट कोहली कर्णधार असताना कुलदीप यादवला भारतीय संघाकडून फार कमी सामने खेळायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या :-
अभिनेता विल स्मिथने ऑस्करच्या मंचावरच निवेदकाला चोपले; पत्नीचा अपमान सहन झाला नाही
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, ‘या’ डॉक्युमेंट्रीला मिळालं नामांकन
एक कॅचने पळवला हातातोंडातील घास, ‘त्या’ खेळाडूने पुढच्या आठ चेंडूत सामनाचं पलटवला