भारतीय संघाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आशिया कप, टी २० वर्ल्डकपमध्ये सूर्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने घातक फलंदाजीकरत सर्वांचे मन जिंकले आहे.
चांगल्या कामगिरीमुळे सूर्याला टी २० सोबतच वनडे आणि कसोटीमध्येही संधी देण्यात येत आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्या कसोटी मालिकेतही सुर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये ती सिरीज खेळवली जाणार आहे. ९ फेब्रुवारीला पहिला कसोटी सामना होजार आहे.शुक्रवारी बीसीसीआयने कसोटी संघाची घोषणा केलीं आहे. त्या १७ सदस्यांमध्ये सुर्यकुमार यादवची सुद्धा निवड करण्यात आली आहे.
सुर्याची कसोटी संघात निवड झाल्यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत, तर काही क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. सूर्याला इतक्या लवकर कसोटी सामन्यांमध्ये संधी देणे चुकीचे असल्याचें नेटकरी म्हणत आहे. त्याच्यामुळे इतर चांगल्या खेळाडूंवर अन्याय होतोय असे नेटकरी म्हणत आहे.
सरफराज खान सुर्यकुमार यादवपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला कसोटी संघात संधी द्यायला हवी होती, असे एकाने म्हटले आहे. तर काहींनी सूर्याला लगेच डोक्यावर घेऊ नका असे म्हटले आहे. एकाने तर दोघांची आकडेवारी सुद्धा शेअर केली आहे.
सरफराज रणजी ट्रॉफीममध्ये सातत्याने खूप चांगली कामगिरी करत आहे. त्याची कामगिरी पाहता त्याला कसोटी संघात स्थान मिळेल असे म्हटले जात होते. पण त्याच्याऐवजी सूर्याला संधी दिल्यामुळे काही क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘BCCI पैसे घेऊन संघात निवड करते’ असा आरोप करणाऱ्या क्रिकेटपटूचा मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह
अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज; पत्नी निवेदीता म्हणाल्या ‘त्यांना बोलताही येत नाही…
वेड चित्रपटाला मिळालेलं यश पाहून रितेशची वहिनीही भारावली; म्हणाली, तुम्ही दोघं..