‘फॅन्ड्री’ चित्रपटातील जब्याचा नवीन लुक पाहून तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही

नागराज मंजूळे दिग्दर्शित ‘फॅन्ड्री’ चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खुप भरभरुन प्रेम दिले होते. मराठीतील सर्वात यशस्वी चित्रपटांमध्ये या चित्रपटाचे नाव येते. चित्रपटासोबतच चित्रपटातील कलाकार देखील रातोरात प्रसिद्ध झाले होते.

फॅन्ड्री चित्रपटामध्ये सोमनाथ अवघडेने मुख्य अभिनेत्याची भुमिका साकारली होती. तर राजेश्वरी खरातने मुख्य अभिनेत्रीची भुमिका साकारली होती. चित्रपटाच्या रिलीजनंतर दोघेही खुप प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या कमी वयातील उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

अभिनयाची पार्श्वभुमी नसलेला सोमनाथ मुळचा करमाळा तालूक्यातील आहे. त्याला मोठा भाऊ आणि छोटी बहीण आहे. सोमनाथ गावातील कार्यक्रमांमध्ये हलगी वाजवायचे काम करायचा. अशाच एका कार्यक्रमामध्ये नागराज मंजूळेने सोमनाथला पाहीले आणि चित्रपटासाठी त्याची निवड केली.

सुरुवातीला सोमनाथला अभिनय करायचा नव्हता. म्हणून तो अनेकदा पळून जायचा. त्याला चित्रपटाविषयी विचारण्यासाठी लोकं यायचे तेव्हा तो पळून जायचा. तो गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसायचा. शुटींग सुरु होण्या अगोदर त्याने अनेकदा असे केले होते.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोमनाथ प्रसिद्ध झाला. पण या चित्रपटानंतर सोमनाथ दुसऱ्या कोणत्याही चित्रपटामध्ये दिसला नाही. एवढ्या वर्षांमध्ये सोमनाथचा लुक पुर्णपणे बदलला आहे. त्याला ओळखणे देखील कठिण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याने एक फोटोशूट केला आहे. त्याचे हे फोटो बघून लोकांची बोलती बंद झाली आहे. एवढी वर्ष सोमनाथने अभिनयासोबतच लुकवर देखील खुप मेहनत केली आहे. आत्ता या नवीन लुकसोबत सोमनाथ लवकरच एका नवीन चित्रपटामध्ये झळकणार आहे.

त्याच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘फ्रि हिट दणका’ आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये तो हातात बॅट घेऊन दिसत आहे. हा फोटो पाहून चित्रपट क्रिकेटवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. सुनिल मंगरे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

सोमनाथसोबतच चित्रपटामध्ये अरबाज सल्या आणि तानाजी लंगड्या ही सैराटमधील हिट जोडी दिसणार आहे. त्यामूळे प्रेक्षक चित्रपटासाठी खुप उत्सूक आहेत. फ्रि हिट दणका चित्रपट १६ एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री अपूर्वा एस मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

लग्नाआधीच बॉयफ्रेंडपासून गरोदर राहिल्या होत्या ‘या’ अभिनेत्री; तरीही लग्नानंतर नवऱ्याने दिल्ला सन्मान

समीर आठल्येच्या प्रेमात पागल झालेल्या अलका कुबलने स्वतः केले त्यांना लग्नासाठी प्रोपोज; वाचा पूर्ण किस्सा

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानच्या प्रेम कहाणीत अमृता सिंग बनली होती खलनायिका

‘याची’ ओळख तर मातोश्रीचा चप्पल चोर, नारायण राणेंवरील टीकेला निलेश राणेंचे उत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.