चाहत्याने केले होते मीनाक्षी शेषाद्रीला जबरदस्ती किस; त्यानंतर मीनाक्षीने जे केले वाचून धक्का बसेल

फिल्म इंड्स्ट्रीतील कलाकारांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. देशासोबतच देशा बाहेरही बॉलीवूड कलाकारांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. खास करुन बॉलीवूड अभिनेत्रींचा. अभिनेत्रींवर करोडो लोकं फिदा आहे. अभिनेत्रींचा सुंदरता आणि सौंदर्य अनेकांना वेडं लावून जाते.

पण कधी कधी हेच फॅन्स त्यांच्या सगळ्या सीमा पार करुन जातता. बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी फॅन्सच्या वेडेपणाचा सामना केला आहे. असाच एक अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. ८० च्या दशकातील सर्वात सुंदर आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते.

मीनाक्षीने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. म्हणून त्या खुप कमी वेळात बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्री बनल्या होत्या. यशाच्या शिखरावर असताना त्यांच्यासोबत एका फॅनने गैरवर्तन केले होते. त्यामूळे त्यांनी त्या फॅनच्या कानाखाली वाजवली होती. ही गोष्ट त्यावेळी खुप जास्त चर्चेचा विषय बनली होती.

हा किस्सा आहे १९८९ चा. त्यावेळी मीनाक्षी जुहूच्या एका बंगल्यात ‘नाचे नागिन गली गली’ ची शुटींग करत होत्या. या चित्रपटात अभिनेते नितीश भारतद्वाज देखील काम करत होते. चित्रपटाची शुटींग सुरु असताना अनेक फॅन्सला मीनाक्षीला भेटायला यायचे.

नेहमीप्रमाणे चित्रपटाची शुटींग झाली होती. मीनाक्षी सेटवर आली आणि तिचे सीन्स शुट केले. यामध्येच एक डान्स सीन देखील होता. त्याची शुटींग झाल्यानंतर मीनाक्षी मेकअप रुमकडे निघाल्या. त्यावेळी एक व्यक्ति आला आणि त्याने मिनाक्षीला पकडले.

अचानक झालेल्या हल्ल्यामूळे मिनाक्षीला काहीही करता येत नव्हते. त्यांना काहीच कळत नव्हते. तो माणून मीनाक्षीला सोडायला तयार नव्हता. त्याने मीनाक्षीला किस करायला सुरुवात केली. ज्यामूळे ती आणखी चिडली. हे सगळं काही सुरु असताना सेटवरील लोकं फक्त बघत होते. कारण त्यांना वाटले की, हा चित्रपटातील एक सीन आहे.

थोड्या वेळाने मीनाक्षी त्या चाहत्याच्या तावडीतून सुटल्या. त्यांनी त्या माणसाला मारायला सुरुवात तेव्हा सेटवरील लोकांना समजले की, हा सीन नाही. खरचं कोणी तरी मीनाक्षीला जबरदस्ती पकडले होते. त्यानंतर सेटवरील लोकांनी त्या माणसाला चांगलेच मारले.

मार खाल्ल्यानंतर त्या व्यक्तिने सांगितले की, तो मीनाक्षीचा खुप मोठा चाहता आहे. तिला भेटण्यासाठी तो हैद्राबादवरुन आला होता. मीनाक्षीला समोर त्यांचे कंट्रोल सुटले आणि त्याच्याकडून हे कृत्य झाले. त्याने हात जोडून मीनाक्षी आणि बाकी सर्व लोकांची माफी मागितली. या घटनेनंतर मीनाक्षीने सेटवरील चाहत्यांना भेटायला नकार दिला.

महत्वाच्या बाचम्या –

अर्जुन कपूरने सांगितले आई वडिलांच्या घटस्फोटाचे दुःख; म्हणाला, सोळाव्या वर्षी १५० वजन झाले
‘या’ आहेत बॉलीवूडच्या सर्वात कमी शिकलेल्या अभिनेत्री; एक तर आहे फक्त पाचवी पास
पतीला सोडून मी दुसऱ्या पुरुषासोबत रिलेशनमध्ये आहे पण…; अभिनेत्रीचा खुलेआम गौप्यस्फोट
इंडियन आयडलमध्ये बापाविना दिसणार सायली कांबळे, तिने सांगीतलेले कारण ऐकून तुम्हालाही येईल रडू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.