सिंधूला कार भेट देण्याची चाहत्याची मागणी, आनंद महींद्रांच्या उत्तराने मागणी करणारा गपगार

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. सिंधूच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सिंधूने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास रचला आहे.

सिंधूच्या या यशानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्विट चर्चेत आहे. एका नेटकऱ्याने आनंद महिंद्रा यांच्याकडे सिंधूसाठी खास मागणी केली होती. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जशी थार कार बक्षीस देण्यात आली होती.

तशीच अलिशान कार सिंधूलाही बक्षीस रुपात द्यावी अशी मागणी नेटकऱ्याने केली होती. ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूचे अभिनंदन करताना या नेटकऱ्याने उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला महिंद्रा थार भेट द्यायला पाहिजे, असे ट्विट केले. ट्विट करताना त्याने आनंद महिंद्रा आणि पीव्ही सिंधू यांना टॅगही केले होते.

सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असलेल्या आनंद महिंद्रा यांनी यावर उत्तर दिले आहे. आनंद महिंद्रा यांनी एक फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. सिंधूच्या गॅरेजमध्ये एक थार आधीच पार्क असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २०१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन पदके मिळाली होती.

पीव्ही सिंधूने रौप्य तर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवले होते. त्यावेळी आनंद महिंद्रा यांनी दोघींना अलिशान कार बक्षीस स्वरुपात दिली होती. सिंधूच्या कामगिरीच कौतुक करताना आनंद महिंद्रा यांनी तिला गोल्डन गर्लची उपमा दिली आहे.

मानसिक क्षमता सिद्ध करण्यासाठी एखादी ऑलिम्पिक स्पर्धा असती तर सिंधू त्यात सर्वोच्च ठरली असती. एका पराभवानंतर कांस्य पदकासाठी खेळणे खूप कठीण असते. पराभवातून सावरत किती मानसिकतेने ती कांस्य पदकाच्या लढतीत उतरली असेल, अशा शब्दांत आनंद महिंद्रांनी सिंधूचे कौतुक केले आहे.

कांस्य पदक जिंकणाऱ्या सिंधू आमच्यासाठी गोल्डन गर्लच आहे, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशाला पी व्ही सिंधूवर गर्व आहे. तिने खूप उत्तम प्रकारे कामगिरी केलेले आहे. राजकारणी, सेलेब्रिटींसह चाहत्यांनी सिंधूच्या या कामगिरीनंतर तिचे अभिनंदन केले आहेत.

ताज्या बातम्या

टाटा समूह देणार एअरटेलसह मुकेश अंबानींना टक्कर, या कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती

दुधात भेसळ आहे की नाही हे घरबसल्या ओळखू शकतात तुम्ही; काही मिनिटांतच कळेल भेसळयुक्त आहे की शुद्ध

आपण कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.