Share

Bigg Boss 19 Contestants List: राजकीय वादांनंतर मराठमोळा कॉमेडीयन ‘बिग बॉस 19’च्या घरात, मनोरंजनाची नवी सुरुवात

Bigg Boss 19 Contestants List : बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) यांचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोच्या घरात कोण प्रवेश करणार? या चर्चांना जोर आला होता. अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत असताना, अखेर बिग बॉस 19 मध्ये एक मराठमोळा चेहरा दाखल झाला आहे.

या वर्षी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणारा मराठमोळा चेहरा म्हणजे प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि युट्यूबर प्रणित मोरे (Praneet More). चाहत्यांमध्ये त्याची मोठी उत्सुकता आहे आणि त्याला ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ म्हणून ओळखले जाते.

‘बिग बॉस’चा आतापर्यंत 18 सीझन झाले आहेत, आता 19 वा सीझन टीव्ही तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. या वर्षीच्या सीझनमध्ये अनेक टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सहभागी आहेत.

प्रणित मोरे कोण?

प्रणित मोरे (Praneet More) हा मराठमोळा स्टँड-अप कॉमेडियन असून त्याच्या क्लासी कॉमेडी टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर घर करून गेला आहे. त्याने अनेक कॉमेडी शो केले आहेत तसेच युट्यूबवर त्याचे स्टँड-अप व्हिडीओज उपलब्ध आहेत. इंस्टाग्रामपासून युट्यूबपर्यंत प्रणितच्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळतो.

सोशल मीडियावर प्रणित मोरेची लोकप्रियता फार मोठी आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 4 लाख 31 हजार (431 हजार) फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर त्याचे 1 मिलियनहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. त्याचे इंस्टाग्राम अकाउंट 2 हजारांहून अधिक पोस्ट्सनी भरलेले आहे.

बॉलिवूडच्या अभिनेत्यांवर विनोद, आणि प्रकरणातील वाद

प्रणित मोरेने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोद केले आहेत. त्यापैकी एक प्रकरण चर्चेत राहिले. अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘स्काय फोर्स’ (Sky Force 2025) चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या वीर पहाडिया (Veer Pahadiya) याची खिल्ली करणाऱ्या प्रणितच्या शो दरम्यान काही लोकांनी त्याच्यावर मारहाण केली. या प्रकरणात वीर पहाडियाने सांगितले की, त्याचा प्रणितशी काही संबंध नाही आणि प्रणितने सार्वजनिकपणे माफी देखील मागितली.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now