प्रसिद्ध पंजाबी आणि बॉलीवूड गायक बी प्राक यांना त्यांच्या घरी एक हृदयद्रावक बातमी आली आहे. बी प्राक आणि त्यांची पत्नी मीरा यांनी त्यांचे नवजात मूल गमावले आहे. बी प्राक गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या घरी लहान पाहुण्यांच्या आगमनाचा आनंद शेअर करत होते.(Bollywood, Singer, Bee Prak, Meera, Instagram, Social Media, Newborn)
पत्नीचा बेबी शॉवरही त्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला. हे त्यांचे दुसरे अपत्य होते. त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला होता पण या मुलीचा जन्मानंतर काही वेळातच मृत्यू झाला. बी प्राक यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली आहे.
बी प्राक यांनी इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे- ‘अत्यंत दु:खाने कळवत आहे की आमच्या नवजात मुलाचे जन्मावेळी निधन झाले आहे. पालक या नात्याने आपण ज्या काळातून जात आहोत तो सर्वात वेदनादायी आहे.
त्यांनी पुढे लिहिले- ‘आम्ही सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या प्रयत्नांसाठी आभार मानू इच्छितो. या दु:खाने आम्ही तुटलो आहोत. आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो की कृपया यावेळी आमच्या गोपनीयतेची काळजी घ्या. मीरा आणि बी प्राक’. गायक बी प्राकच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे आणि त्यांना धैर्य राखण्यास सांगितले आहे.
बी प्राकच्या पोस्टवर राजीव अडातिया यांनी लिहिले, ‘तुझ्यासाठी खूप प्रेम पाठवत आहे. खंबीर राहा’. त्याचवेळी करण जोहरने लिहिले- ‘माझ्या भावना आणि प्रार्थना तुम्हा दोघांसोबत आहेत’. बी प्राक आणि मीरा यांचा विवाह ४ एप्रिल २०१९ रोजी झाला होता. लग्नानंतर २०२० मध्ये दोघेही एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव अदाब आहे.
महत्वाच्या बातम्या
तब्बल ३० तास चौकशी: ईडीच्या कठीण प्रश्नांवर राहुल गांधींनी दिली ही उत्तरं, म्हणाले…
या दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीने केली भारतरत्नची मागणी, म्हणाली, ‘तो कोहिनूर होता, त्याला भारतरत्न द्या’
रितेशकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जेनेलियाने शेअर केला ‘हा’ फोटो, चाहते भावूक