Share

झटपट नाव कमवण्यासाठी अभिनेत्री चित्रपट निर्मात्यांसमोर.., प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या वक्तव्याने खळबळ

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउच प्रकरणाबद्दल खुलासे केले आहेत. यावेळी अभिनेत्रींनी अनेक दिग्दर्शकांवर आरोप देखील केले होते. आता साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते, लेखक गीता कृष्णा(Geeta Krushna) यांनी कास्टिंग काउच संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानामुळे चित्रपट क्षेत्रात खळबळ माजली आहे. (famous director geeta krushna conterversial statament)

सध्या दिग्दर्शक गीता कृष्णा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक गीता कृष्णा कास्टिंग काउचबाबत आपले मतं व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका मुलाखतीमधील आहे. करिअरच्या सुरुवातीपासून तुम्हाला आतापर्यंत इंडस्ट्रीत काय फरक जाणवतो? असा प्रश्न मुलाखतीमध्ये दिग्दर्शक गीता कृष्णा यांना विचारण्यात आला.

यावर उत्तर देताना दिग्दर्शक गीता कृष्णा म्हणाले की, “हो इंडस्ट्रीत फरक जाणवत आहे. आता अभिनेत्री यश मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. पण यापूर्वी असे नव्हते. अनेक अभिनेत्री शॉर्टकट मार्ग स्वीकारत आहेत. आता अभिनेत्री चांगले चित्रपट मिळवण्यासाठी आणि झटपट नाव कमवण्यासाठी चित्रपट निर्मात्यांसमोर स्वतःला स्वाधीन करतात”, असे दिग्दर्शक गीता कृष्णा यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

“‘आजच्या काळात परिस्थिती अशी झाली आहे की फिल्म इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचने हनी ट्रॅपचे रूप धारण केले आहे”, असे देखील दिग्दर्शक गीता कृष्णा यांनी सांगितले आहे. गीता कृष्णा यांनी ‘संकीर्तन’, ‘केचुरालू’ आणि ‘कोकिला’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

कास्टिंग काउचचा मुद्दा चित्रपटसृष्टीत बराच काळ गाजत आहे. कास्टिंग काउचच्या विरोधात अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचच्या विरोधात आवाज उठवला होता. तसेच अभिनेत्री कंगना रणौत, विद्या बालन, सुरवीन चावला, ममता कुलकर्णी, पायल रोहतगी आणि टिस्का चोप्रा यांच्या सोबत देखील कास्टिंग काउच सारखा प्रकार घडला आहे.

बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाबाबत खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुरवीन चावला कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. एका साऊथ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याने अभिनेत्री सुरवीन चावलाला तिच्या शरीराच्या आकारावरून अश्लील प्रश्न विचारले होते.

महत्वाच्या बातम्या :-
‘भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात’, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वादग्रस्त वक्तव्य
सिद्धु मुसेवालाचे ५ मोठे वाद: कधी गाण्यांतून खलिस्तानला समर्थन तर कधी रायफल घेऊन बनवले व्हिडीओ
नारळ पाणी पिऊन आणि पेन पेपर घेऊन आशिष नेहराने कसा बांधला गुजरात टायटन्ससारखा संघ?

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now