‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीचे दुःखद निधन… मराठी चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातला आहे. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे. अशात अनेक मराठी कलाकारंचाही मृत्यु होत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत सध्या शोककळा पसरली आहे.

असे असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विनोदी कलाकार भुषण कडू यांची पत्नी कादंबरीचे निधन झाले आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी कोरोनामुळे कादंबरी यांचे निधन झाले आहे. पत्नीच्या निधनामुळे भुषण कडूवर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

काही दिवसांपुर्वीच कादंबरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कादंबरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

कादंबरी यांना सुरुवातील ठाणाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. कादंबरी यांच्या जाण्याने भुषण यांना मोठा धक्का बसला आहे.

भुषण कडू यांना ७ वर्षांचा मुलगा आहे. तर कादंबरी या भुषण यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या मुलाचे नाव प्रकिर्थ असे आहे. जेव्हा मराठी बिगबॉसमध्ये भुषण कडू यांनी एँट्री केली होती, तेव्हा त्यांच्या मुलाला आणि पत्नीला एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते.

दरम्यान, अभिनेता भुषण कडू यांनी नेहमीच त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीतील बुलेट ट्रेन यांसारख्या शोमध्ये त्यांनी काम केले आहे. मात्र आज कादंबरी यांच्या जाण्याने त्यांच्या पुर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.