फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

सध्या टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी शो सुरू आहेत. मराठी, हिंदी, तमिळ अशा सर्व भाषांमध्ये कॉमेडी होत आहेत. आजची कॉमेडी लाईव्ह असते. कलाकार समोरासमोर विनोद करून लोकांचे मनोरंजन करतात.

पण एक काळ असाही होता ज्यावेळी टेलिव्हिजनवर स्क्रिप्टनुसार कॉमेडी केली जात होती. त्यासोबतच मोठ्या मोठ्या लोकांच्या नकला करून कॉमेडी केली जायची. २००५ मध्ये इंडियन टेलिव्हिजनवर ‘इंडियन लाफटर चँलेंज’ हा शो सुरू झाला होता. या शोने टेलिव्हिजनवरचे सगळे रेकॉर्ड तोडले होते.

हा शो खुप जास्त प्रसिद्ध झाला होता आणि याच शोने आपल्याला काही दर्जेदार कॉमेडीयनसुद्धा दिले आहेत. आज आपण या शोच्या पहिल्या सीजनमध्ये सहभाग घेतलेल्या एका कॉमेडीयनबद्दल जाणून घेणार आहोत. हे कॉमेडीयन आहेत राजू श्रीवास्तव.

राजू श्रीवास्तव २००५ ते २०१० या कालावधीमधले सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. पण वेळेनुसार सगळे काही बदलत जाते. त्याच प्रमाणे कॉमेडीत पण अनेक बदल झाले. त्यामुळे राजू श्रीवास्तवसारखे अनेक दर्जेदार कलाकार टेलिव्हिजनवरून गायब झाले.

चला तर मग जाणून घेऊया राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.

राजू श्रीवास्तवचे बालपण –

राजू श्रीवास्तव यांचा जन्म कानपुरमध्ये झाला होता. त्यांचे वडील सरकारी नोकरी करत होते. त्यासोबतच ते एक उत्तम कवीसुद्धा होते. ‘बलई काका’च्या नावाने त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध होत्या. राजू लहान असताना अनेक वेळा वडिलांच्या कविता वाचत होते.

राजू यांचे पुर्ण शिक्षण कानपूरमध्ये झाले होते. शाळेत असताना ते नेहमी आपल्या शिक्षकांची नकल करायचे आणि त्यांची ही नकल नेहमी सर्वांना आवडायची. राजू अमिताभ बच्चनचे खुप मोठे फॅन होते. त्यामूळे अनेक कार्यक्रमांमध्ये ते त्यांची नकल करायचे. राजूला कानपूरमध्ये ज्युनियर अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाऊ लागले.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी कानपूरमध्ये कॉमेडीमध्ये खुप जास्त नाव कमावले होते. अमिताभ बच्चननंतर त्यांनी अनेक कलाकारांची नकल करण्यास सुरुवात केली. कानपूरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना कॉमेडीसाठी बोलवले जाऊ लागले.

अशी झाली कॉमेडीयन म्हणून कॉमेडीची सुरुवात –

राजुने अनेक कॉमेडी पात्र स्वतः तयार केले होते. त्यांचे हे पात्र खुप प्रसिद्ध झाले होते. राजूचे टॅलेंट बघून त्यांच्या एका मित्राने त्यांना सी डी बनवून मार्केटमध्ये विकण्याचा सल्ला दिला. राजूने ही गोष्ट ऐकली आणि त्यांच्या या कॉमेडी पात्रावर सी डी बनवून मार्केटमध्ये दिली.

या सी डीमूळे राजू फक्त कानपूरच नाही तर कानपूरच्या बाहेरसुध्दा खुप प्रसिद्ध झाले. त्यांच्या सी डी मुंबईमध्ये विकल्या जाऊ लागल्या. त्यांना मुंबईत खुप प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर राजू श्रीवास्तव मुंबईत आले आणि त्यांनी चित्रपटांसाठी ऑडीशन देण्यास सुरुवात केली. त्यांना ‘तेजाब’ चित्रपटामध्ये एक छोटी भुमिका मिळाली.

त्यानंतर त्यांनी ‘मैने प्यार किया’ चित्रपटामध्ये एक छोटी भुमिका निभावली होती. त्यांनी बाझीगर, मिस्टर आझाद अशा अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भुमिका केल्या. पण राजूला या भुमिकांचा जास्त फायदा होत नव्हता. त्यामूळे त्यांनी टेलिव्हिजनवर येण्याचा निर्णय घेतला.

राजू श्रीवास्तवची टेलिव्हिजनवर एन्ट्री

टेलिव्हिजनवर राजू श्रीवास्तवला त्या वेळच्या प्रसिध्द ‘देख भाई देख’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या काळच्या सर्वात प्रसिद्ध ‘शक्तिमान’ मालिकेत काम केले. पण या सर्व मालिकेमधून त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती.

या कालावधीमध्ये राजू श्रीवास्तव यांनी कॉमेडी सोडली नव्हती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये स्टँड अप कॉमेडी करायचे. पण त्या काळी स्टँड अप कॉमेडी जास्त प्रसिद्ध नव्हती. त्यामूळे लोक कॉमेडी शोला थांबायचे नाही. या सर्व प्रकारामुळे राजू खुप परेशान झाले होते. कारण त्यांच्याकडे टँलेंट होते. पण त्याची कदर कोणी करत नव्हते.

द ग्रेट इंडियन लाफटर चँलेंजमधून मिळाली प्रसिद्धी –

राजूला समजत नव्हते की त्यांनी त्यांच्या टॅलेंटचा वापर कुठे आणि कसा करावा. शेवटी २००५ मध्ये त्यांना एक संधी मिळाली त्यांचे टॅलेंट दाखवण्याची. ही संधी दिली होती टेलिव्हिजनवर नव्याने सुरु झालेला कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन लाफटर चँलेंज’ने.

हा शो टेलिव्हिजनवर कॉमेडी घेऊन आला होता. यात वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेडी होत्या. या शोच्या पहिल्या सीजनमध्ये राजू श्रीवास्तव यांनी सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्यांना सुनील पाल, एहसान कुरेशी यांनी चांगलीच स्पर्धा दिली होती. या शोने राजूला टेलिव्हिजनवरचा स्टार बनवले होते.

या शोमूळे राजू श्रीवास्तव यांच्या कलेला खरी ओळख मिळाली. राजू श्रीवास्तव यांचे अनेक कॉमेडी पात्र खुप प्रसिध्द झाले होते. जसे की गजोधर काका, पिंकी पार्लरवाली ही सर्व पात्र राजु श्रीवास्तव यांची ओळख बनले होते.

त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवले जायचे. याच कालावधीमध्ये राजूने एक डॉनचे पात्र तयार केले होते. या पात्रात ते डॉनची खुप मस्करी करायचे आणि अनेक जोक्स डॉनवर करायचे. यामूळे त्यांना अंडरवर्ल्डमधून फोन येऊ लागले. त्यांना सांगितले जाऊ लागले की, ‘डॉनचे पात्र निभावणे बंद कर. नाहीतर तुला याची चांगलीच किंमत द्यावी लागेल.’

सुरूवातीला त्यांनी या फोनकडे दुर्लक्ष केले. पण नंतर त्यांना समजले हे फोन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून येत आहेत. त्यावेळी मात्र त्यांनी मुंबई पोलिसांची मदत घेतली आणि हे फोन बंद केले.

राजू श्रीवास्तवने बिग बॉसमध्ये घेतला भाग-

२००९ पर्यंत राजू श्रीवास्तव यांची प्रसिद्धी खुप जास्त वाढली होती. त्यामूळे त्यांना टेलिव्हिजनवरचा सर्वात controversial शो ‘बिग बॉस’मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ‘बिग बॉसमध्ये भाग घेतला. पण जिंकू शकले नाहीत.

२०१३ मध्ये एक चित्रपट आला होता. त्यावेळी राजू श्रीवास्तवने या चित्रपटाच्या निर्मात्यावर केस केली होती. ते म्हणाले की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला न विचारता माझे पात्र या चित्रपटात कॉपी केले आहे.

हा चित्रपट होता ‘डबल धमाल’.या चित्रपटात सतीश कौशिल यांनी बाबाची भुमिका निभावली होती. राजू श्रीवास्तवचे म्हणे होते की, ‘हे पात्र मी माझ्या अनेक शोमध्ये निभावले होते. त्यामुळे हे पात्र कॉपी करण्यात आले आहे.’ पण या गोष्टीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांनी दुर्लक्ष केले.

राजू श्रीवास्तवने राजकारणात प्रवेश केला –

राजू श्रीवास्तव दर्जेदार कॉमेडीयन होते. पण वेळेनुसार टेलिव्हिजन बदलले आणि टेलिव्हिजनवरची कॉमेडीसुध्दा बदलली. टेलिव्हिजनवर सुनील ग्रोव्हर, कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांसारखे कॉमेडीयन आले होते. त्यामूळे राजू श्रीवास्तवसारख्या कॉमेडीयनला काम मिळणे कमी झाले.

राजू श्रीवास्तव कॉमेडीपासून दूर गेले नाहीत. ते अनेक शो करत होते. अशातच त्यांनी २०१४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते आज त्यांची पत्नी आणि मुलांसोबत आनंदाने जगत आहेत. पण राजू श्रीवास्तव सारखी कॉमेडी आणि नकल कोणत्याही कलाकाराला जमू शकत नाही. म्हणूनच ते आजही त्यांच्या कॉमेडीसाठी ओळखले जातात.

महत्वाच्या बातम्या
‘वल्लव रे नखवा’ या गाण्यावर आज्जीने केला तुफान डान्स, पाहून सगळेच झाले थक्क; पडत आहे लाईक्सचा पाऊस…
विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, काळ जाईल तेव्हा बघू- शरद पवार
जिद्दीला सलाम! १६ वेळा फ्रॅक्चर, ८ वेळा शस्त्रक्रिया तरी युपीएससी पास करुन तरुणी झाली कलेक्टर
धक्कादायक! कर्जाला कंटाळून मुलीला मारले, नंतर आईवडिलांनी संपवले जीवन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.