Share

Mumbai crime news: मुंबई हादरली! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं

Mumbai crime news : मुंबई (Mumbai) शहरातील कांदिवली (Kandivli) परिसरात बुधवारी सायंकाळी एक अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणारी घटना घडली. एका प्रसिद्ध गुजराती टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा (Television Actress) १६-१७ वर्षांचा मुलगा (Actor’s Son) राहत्या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

ही अभिनेत्री कांदिवलीमधील ‘सी ब्रुक’ (Sea Brook) नावाच्या उच्चभ्रू गगनचुंबी इमारतीत राहते. सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास तिच्या मुलाने इमारतीवरून उडी घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलगा ट्युशन क्लासला (Tuition Class) जाण्यास तयार नव्हता. त्यावरून आई व मुलामध्ये वाद झाला. संतप्त अवस्थेत, मुलगा वरच्या मजल्यावर गेला आणि अचानक उडी घेतली.

उंचावरून खाली पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कांदिवली परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आणि पंचनामा (Spot Investigation) करण्यात आला. याप्रकरणी सध्या अपघाती मृत्यूची (Accidental Death Report) नोंद करण्यात आली असून, नेमकी आत्महत्येची कारणमीमांसा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

मुलाने इतक्या उंच मजल्यावरून उडी घेतली तेव्हा कोणी काही पाहिले का, त्यावेळी त्याच्याजवळ कोणी होते का, या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमागे फक्त क्षुल्लक वाद होता की अजून काही मानसिक दबाव होता, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now