Share

प्रसिद्ध अभिनेत्रीची आई गंभीर आजारी, ICU मध्ये उपचार सुरू; अभिनेत्रीने चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

बॉलीवूड अभिनेत्री जरीन खानच्या(Zareen Khan) आईची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. अभिनेत्री जरीन खानच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अभिनेत्री जरीन खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. यावेळी अभिनेत्री जरीन खानने तिच्या चाहत्यांना आईच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.(Famous actress’s mother seriously ill, undergoing treatment in ICU)

अभिनेत्री जरीन खानने आईच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये अभिनेत्री जरीन खान म्हंटले की, “माझ्या आईची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. काल रात्री आईला पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. सध्या तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. माझी आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा”, अशी विनंती जरीन खानने तिच्या चाहत्यांना केली आहे.

यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी अभिनेत्री जरीन खानच्या आईच्या ढासळत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्री जरीन खानने २०१० मध्ये ‘वीर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत होता. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही.

jagran

त्यानंतर अभिनेत्री जरीन खान ‘रेडी’ या चित्रपटातील एका गाण्यात झळकली होती. अभिनेत्री जरीन खानला बॉलीवूडमध्ये काही यश मिळाले नाही. तिला चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या नाहीत. त्यानंतर अभिनेत्री जरीन खानने या म्युझिक व्हिडिओ करण्यास सुरवात केली. अभिनेत्री जरीन खानच्या अनेक म्युझिक व्हिडिओला चाहत्यांची पंसती मिळाली आहे.

सध्या अभिनेत्री जरीन खानचा ‘ईद हो जाएंगे’ हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री जरीन खान अभिनेता उमर रियाझसोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जरीन खान आणि ‘बिग बॉस’ फेम शिवाशिष मिश्रा यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

त्यामुळे अभिनेत्री जरीन खान खूप चर्चेत देखील आली होती. एका मुलाखतीत अभिनेत्री जरीन खानने शिवाशिष मिश्रासोबतच्या नात्यासंदर्भात भाष्य केलं होतं. “मला लगेच कोणत्याही निष्कर्षावर जायचे नाही. पण हा माझ्या आयुष्यातील अतिशय सुंदर काळ आहे”, असे अभिनेत्री जरीन खानने मुलाखतीत सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने सख्ख्या भावासोबत केला होता रोमान्स, उडाली होती खळबळ
सोमय्यांच्या ज्या जखमेवरून एवढं राजकारण झालं ती जखम निघाली खोटी; वैद्यकीय रिपोर्टमधून मोठा खुलासा
किरीट सोमय्यांवर हल्ला होताना Z सेक्युरिटी कुठे होती?, मुंबईच्या पोलीस आयुक्तांचे CISF महासंचालकांना पत्र

ताज्या बातम्या आरोग्य मनोरंजन

Join WhatsApp

Join Now