नुकताच आश्रम वेबसिरीजचा तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. MX Player या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेता बॉबी देओलने ‘बाबा निराला’ ची भूमिका साकारली आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री आदिती पोहनकर, अनुरिता झा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. (famous actress anurita zha talk about webseries scene)
‘आश्रम ३’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुरिता झा हीने बाबा निराला यांच्या आश्रमातील बबिताचे पात्र साकारले आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री अनुरिता झा हीने अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्री अनुरिता झा हीने ‘आश्रम ३’ या वेबसिरीजमधील इंटिमेट सीन्सबाबत खुलासा केला आहे.
या मुलाखतीदरम्यान अभिनेत्री अनुरिता झा हीला एक प्रश्न विचारण्यात आला. आश्रम ३’ या वेबसिरीजमधील तुझे इंटिमेट सीन्स पाहिल्यानंतर कुटुंबाने काय प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर अभिनेत्री अनुरिता झा हीने उत्तर दिले की, “मी पहिल्यांदाच इंटिमेट सीन केला आहे. मी यापूर्वी असे इंटिमेट सीन्स केले नाहीत. त्यामुळे बोल्ड सीन करण्यापूर्वी मी माझ्या वडिलांना फोन करून यासंदर्भातील माहिती दिली होती.”
“मी वडिलांना सांगितले की ‘आश्रम ३’ या वेबसिरीजमध्ये मी बोल्ड भूमिका साकारत आहे. त्यावर वडिलांनी मला पाठिंबा देत या वेबसिरीजमध्ये काम करण्यास होकार दिला”, असे अभिनेत्री अनुरिता झा हीने मुलाखतीत सांगितले आहे. “ज्यावेळी मला वडिलांकडून परवानगी मिळाली, त्यावेळी मला खूप छान वाटले”, असे देखील अनुरिता झा हीने मुलाखतीत सांगितले.
अभिनेत्री अनुरिता झा पुढे म्हणाली की, “ज्यावेळी मी या सीनची शूटिंग करत होते, त्यावेळी सेटवर फक्त ४ ते ५ लोक होते. या सिनचे शूटिंग करण्यापूर्वी मी दिग्दर्शक प्रकाश झा सरांसोबत खूप वेळ चर्चा केली. त्यानंतर मी या सीनचे शूटिंग पूर्ण केले”, असे देखील अभिनेत्री अनुरिता झा हीने मुलाखतीत सांगितले आहे.
‘आश्रम ३’ या वेबसिरीजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. ‘आश्रम ३’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या वेबसिरीजची प्रेक्षकांमध्ये फार चर्चा होती. आश्रम च्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. ‘आश्रम ३’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता हीने देखील अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
‘राष्ट्रपती हवाच असेल तर..,’ संजय राऊत स्पष्टच बोलले
आश्रम ३ च्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘बोल्ड सीन करण्यापूर्वी वडिलांना…’
धक्कादायक! लग्नात बेभान होऊन नाचता नाचता झाला मृत्यू; पाहा व्हायरल व्हिडीओ